विशेष प्रतिनिधी
पुणे :Dr. Jalider Supekar पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी राज्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप केले आहेत. दमानियांनी त्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. या आरोपांवर सुपेकरांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे.Dr. Jalider Supekar
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, “जालिंदर सुपेकर नावाचे ते मुलाचे (शशांक हगवणकर) मामा आहे. त्यांचा धाक दाखवून त्यांच्यावर (सूनांवर) बरंचस काही करायचे. त्यांच्या कुटुंबांना धाक दाखवायचे. त्या दोन्ही मुलींना धाक दाखवायचे. मयुरीने (राजेंद्र हगवणेच्या मोठ्या मुलाची पत्नी) जेव्हा तक्रार केली होती, तेव्हा तक्रारीवर सुद्धा हे लोक फरार होते. मग परत आले. त्यांना (मयुरीच्या कुटुंबाला)धमकावण्यात आलं की तुम्ही आमचं काही बिघडवू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं की, जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अंजली दमानियांनी गंभीर आरोप करताना केली.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही सुपेकर यांचे नाव घेत आरोप केला आहे. “सुपेकर हे त्यांचे (शशांक हगवणेचा) मामा आहेत, असे रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.
अंजली दमानिया आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुपेकर यांच्या नावाचा उल्लेख करत आरोप केले. त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक जालिदर सुपेकर यांनी खुलासा केला आहे. “माझा या प्रकरणाशी दुरान्वयानेही संबंध नाही. सहा महिने झाले हगवणे कुटुंबीयांशी भेट झालेली नाही. हगवणे कुटुंबीय माझे लांबचे नातेवाईक आहेत”, असा खुलासा करत पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
Vaishnavi Hagvane Suicide : Demand of Enquiry of Inspector General of Police Dr. Jalider Supekar
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर