विशेष प्रतिनिधी
पुणे : Devendra Fadnavis आमच्याकडे ते कायम पहिल्या रांगेत राहिले. आमच्याकडे आमच्यापेक्षा पहिले त्यांना मान होता. आता हे बघितलं की दुःख वाटतं’, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. Devendra Fadnavis
दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरे हे मागच्या रांगेत बसलेले होते. या बैठकीतील फोटो समोर आल्यानंतर उद्धव ठाकरेंना बैठकीत मिळालेल्या मान सन्मानावरून महायुतीच्या नेत्यांनी लक्ष्य केले. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्याकडे ते कायम पहिल्या रांगेत राहिले. आमच्याकडे आमच्यापेक्षा पहिले त्यांना मान होता. त्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. भाषणात खूप म्हणायचं की, दिल्लीसमोर मान झुकणार नाही. दिल्लीसमोर आम्ही पायघड्या टाकणार नाही; पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे? ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे ? हे बघितलं की दुःख होतं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरेंवर निशाणा साधताना काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली आहे. त्यांना या गोष्टीचं काहीच वाटत नसेल तर मी यावर काय प्रतिक्रिया देणार. हे उलट तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्हाला इतक्या मागे का बसवलं होतं?असा सवाल केला होता.
We were always in the front row when we had it.. Devendra Fadnavis’s attack on Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल