विशेष प्रतिनिधी
पुणे : कोथरूड परिसरातील सतत वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांवरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात असा सवाल धंगेकरांनी केला आहे. Ravindra Dhangekar
धंगेकर म्हणाले, “निलेश घायवळसारख्या गुन्हेगारांना पासपोर्ट कोणी दिला? कोथरूडमध्ये शस्त्रबाजी, खंडणी, दहशत, गँगची दादागिरी वाढत असताना स्थानिक आमदार गप्प का बसले आहेत? गुन्हेगारांना कोणाचे संरक्षण आहे?
धंगेकर म्हणाले,“कोथरूड गुन्हेगारीचे केंद्र बनत आहे. गँगवॉर, हल्ले, खंडणीखोरी यामध्ये वारंवार स्थानिक तरुणांना ओढले जात आहे.चंद्रकांत पाटील हे मोठ्या पदावर असूनही गुन्हेगारीवर कारवाई करण्याऐवजी शांत आहेत.” गुन्हेगारांना पोलीस यंत्रणेपासून संरक्षण देणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे.”
कोथरूडमध्ये मागील काही महिन्यांत अनेक गंभीर गुन्हे घडले. दोन दिवसांपूर्वीच पिस्तूलधारी गुंडांनी गृहनिर्माण सोसायटीत घुसून दहशत माजवली होती. याआधीही घायवळ गँगसह इतर टोळ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत
धंगेकरांच्या आरोपांनंतर कोथरूडमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. भाजप समर्थकांचा दावा आहे की धंगेकर केवळ राजकीय फायद्यासाठी आरोप करत आहेत, तर विरोधकांचा पवित्रा आहे की “पाटलांच्या कार्यकाळात गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे.”
भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून धंगेकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त होत आहे. पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले की, “गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू आहे. धंगेकर केवळ राजकीय हेतूने लोकप्रियता मिळवण्यासाठी असे वक्तव्य करत आहेत.
दरम्यान, पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हा कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारानंतर परदेशात पळाला. निलेश घायवळ सध्या स्वित्झर्लंडमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या कुटुंबाची बॅंक खाती गोठवण्यात आली आहे.
कोथरुडमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर घायवळ गँगमधील काही जणांना पोलिसांनी अटक केली असून निलेश घायवळ फरार झाला आहे. मात्र, तो थेट लंडनला पसार झाल्याचं पुणे पोलिसांच्या तपासातून पुढे आले.
पुणे पोलिसांनी 10 बँक अकाऊंट फ्रिज केली आहेत आणि त्यातून 38 लाख रुपये जप्त केले. कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबीयांवर पोलिस व आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
Why does Chandrakant Dada support criminals, a direct question from Ravindra Dhangekar
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!