विशेष प्रतिनिधि
पुणे : आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि सगळीकडेच भक्तीमय वातावरण निर्माण झालंय. पण आपल्या या गणपती बाप्पाला फक्त भारतातच नाही, तर परदेशातही तितकाच मान मिळतो. आश्चर्याची बाब म्हणजे सुमारे ८० टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशिया देशाच्या नोटांवर आपल्या गणपती बाप्पाचं चित्र छापलेलं आहे. Ganesha
इंडोनेशियातील नोटांवर गणेश मूर्तीचं चित्र असण्यामागे काही ऐतिहासिक आणि भौगोलिक कारणं आहेत. इंडोनेशियामध्ये १५ व्या शतकापर्यंत गणेशाच्या प्रतिमा प्रचंड लोकप्रिय होत्या असं म्हटलं जातं. या देशात तेव्हा गणेश जन्माचं वर्णन करणारी काही हस्तलिखितं सापडली होती. त्यानुसार इंडोनेशिया एक तांत्रिक गणेश आहे. जो कवटीच्या अलंकारांनी सजवला जातो. तसंच त्या गणपतीच्या मूर्तीच्या हातात जपमाळ, युद्ध-कुऱ्हाडी आणि रिकामी वाटी आहे. इंडोनेशियातील त्या गणेश मूर्तीचे दोन्ही पाय आडवे वाकवून पायांचे तळवे एकमेकांना स्पर्श करतात, असा उल्लेख आहे.
ही गणेश मूर्ती दक्षिण बालीमधील जेम्बरन येथे आहे. विशेष म्हणजे इंडोनेशियातला हा श्री गणेशा ज्वालामुखींनी वेढलेला आहे. म्हणूनच ही गणेशाची मूर्ती त्या देशाचं नैसर्गिक आपत्तीपासून रक्षण करते, अशी इथल्या लोकांची धारणा आहे. म्हणूनच भारताप्रमाणे इंडोनेशियन लोकांची देखील या गणेश मूर्तीवर अपार श्रद्धा आहे. Ganesha
केवळ गणेशाची मूर्तीच नाही तर गणेशाचा इंडोनेशियाच्या चलनावर असणाऱ्या फोटोमागे देखील एक कहाणी सांगितली जाते. १९९७ साली आशिया खंडातील बहुतांश चलनं घसरत होते. त्यामुळे तेव्हा सगळ्याच देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. तेव्हा इंडोनेशियाच्या अर्थमंत्र्यांना नोटांवर गणपतीचा फोटो छापण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्या अर्थमंत्र्यांनी तो सल्ला आमलात आणला. त्यानंतर काहीच दिवसांनी त्या देशावरील आर्थिक संकट दूर झालं. म्हणून त्यादरम्यान त्या देशातील चलनात श्री गणेशाच्या मूर्तीचं चित्र कायम राहिलं.
या एका कारणाशिवायही इंडोनेशियातील काही वरिष्ठ पत्रकारांच्या म्हणण्यानुसार इंडोनेशियात गणपतीची मूर्ती ही येथील विविधतेचं प्रतीक आहे. १९९८ साली छापण्यात आलेली ती नोट शिक्षण या संकल्पनेवर आधारीत होती. विशेष म्हणजे, भारताप्रमाणे इंडोनेशियात देखील गणपतीला कला, बुद्धी आणि शिक्षणाचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच येथील अनेक शिक्षण संस्थांमध्ये देखील गणपतीचा फोटो वापरला जातो. म्हणूनच तेव्हाच्या चलनांमध्ये देखील श्री गणेशाचा फोटो छापण्यात आला. Ganesha
एवढंच नाही, तर साधारण १९७० ते ८० च्या दशकात इंडोनेशियात हिंदु धर्मीयांची लोकसंख्या वाढली होती. म्हणूनच त्या देशात हिंदू संस्कृतीचा प्रचार प्रसार वाढत होता. त्यामुळे या देशाने भारतातील फक्त गणपतीच नाही, तर हिंदु धर्मातील इतर प्रतीकांनाही आपलंसं केलं. परिणामी आजही तिथल्या संस्कृतीवर हिंदू धर्माची छाप असल्याचं दिसून येतं. म्हणूनच आजघडीला इंडोनेशिया हे एक मुस्लीम राष्ट्र म्हणून ओळखलं जात असलं आणि तिथे केवळ २ टक्के हिंदूंची संख्या असली, तरी देखील त्या देशात गणपतीला एक विशेष स्थान दिलं जातं.
Why is there a picture of Ganesha on the currency of Muslim-majority Indonesia?
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा