एकीकडे अजित पवार अमोल कोल्हेंवर शाब्दिक हल्ले करतायत. तर अमोल कोल्हेही त्यांना उत्तर देताना दिसतायत. अजित पवार मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काउंटर रिअॅक्शन देणं माझ्यासारख्या लहान नेत्याला शोभणारं नाही. त्यांच्याबद्दल कायमच आदर आहे. व्यक्ती म्हणून तो आदर कायमच राहील. मी २०१९ला जिथं होतो, आताही ही तिथंच आहे. त्यांची राजकीय भूमिका मात्र बदललीय. पण तरीही त्यांना भेटून याबद्दल नक्की बोलेन, असं अमोल कोल्हे म्हणालेत. सोबतच बात निकली है तो दूरतक जाएगी, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.