विशेष प्रतिनिधी
मुंबई : गणेशोत्सवाच्या कालावधीतील 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन ठाकरे यांनी मागणीचे पत्र दिले. Amit Thackeray
मनसे नेते अमित ठाकरे यांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या वांद्र्यातील कार्यालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान, गणेशोत्सव कालावधीत होणाऱ्या परिक्षांबाबत चर्चा झाल्याची माहिती अमित ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना अमित ठाकरे म्हणाले, “27 ऑगस्टपासून सुरू होणार गणेशोत्सव सर्वांनी आनंदात साजरा केला पाहिजे. अनेकजण कोकणातून येत असतात. गावाला जाणाऱ्यांचीही संख्या मोठी असते. त्यामुळे गणेशोत्सव कालावधीतील सर्व परिक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी आम्ही केली. Amit Thackeray
याशिवाय, शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे न जाता आशिष शेलार यांची भेट घेत पत्र दिल्याबाबत प्रश्न विचारला असता, “विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी मुद्दा मांडला होता, आणि सर्वांकडे जाण्यापेक्षा थेट सांस्कृतिक मंत्र्यांकडे जाणं योग्य ठरतं”, असे अमित ठाकरे म्हणाले.
Amit Thackeray demands postponement of exams during Ganeshotsav, meets Ashish Shelar
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींची चोरी पकडल्याचा राग, काँग्रेसकडून पत्रकार शिव अरोर यांच्याविरुद्ध एफआयआर
- शक्ती संवाद : महिला सक्षमीकरणाच्या बरोबरच भारतीय संघराज्य व्यवस्थेतला सुसंवाद वाढविण्याचाही सक्षम प्रयोग!!
- Jarange Supporters : जरांगे समर्थक आक्रमक, लक्ष्मण हाकेंना चपलेचा प्रसाद देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस
- … म्हणून शरद पवारांचा उपराष्ट्रपतीपदासाठी राधाकृष्णन यांना पाठिंब्यास नकार