विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी कोणतीही पूर्वसूचना न देता दिल्ली विद्यापीठाच्या उत्तर कॅम्पसला दिलेल्या भेटीवर विद्यापीठ प्रशासनाने तीव्र आक्षेप घेतला आहे. विद्यापीठाने एका अधिकृत निवेदनात ही भेट संस्थात्मक प्रोटोकॉलचे उल्लंघन असल्याचे म्हटले असून, भविष्यात अशा प्रकारची घटना होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. Rahul Gandhi
विद्यापीठाने सांगितले की, राहुल गांधी यांनी यापूर्वीही मे 2023 मध्ये विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहाला परवानगी न घेता भेट दिली होती, आणि त्यावेळीही प्रशासनाने त्यावर आक्षेप नोंदवला होता. गुरुवारी पुन्हा एकदा ते विद्यापीठात परवानगीशिवाय आले व जवळपास तासभर दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन (DUSU) कार्यालयात थांबले. Rahul Gandhi
“आज श्री. राहुल गांधी कोणतीही माहिती दिल्याशिवाय दिल्ली विद्यापीठात आले. त्यांनी DUSU कार्यालयात जवळपास एक तास घालवला. या कालावधीत संपूर्ण परिसर सुरक्षा कारणांनी वेढला गेला होता. विद्यापीठ प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी दुसऱ्यांदा असे केले आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, “DUSU सचिवांच्या कार्यालयात काही विद्यार्थी होते, जे आत अडकले होते. त्यांच्याशी NSUI सदस्यांकडून गैरवर्तन झाले. सचिव कार्यालयाबाहेर होत्या, पण त्यांना आत जाण्याची परवानगी NSUI कार्यकर्त्यांनी दिली नाही. विद्यापीठ अशा प्रकारच्या कृतीचा निषेध करते आणि भविष्यात अशा घटना होणार नाहीत, याची अपेक्षा करते. दोषी विद्यार्थ्यांवर कडक कारवाई केली जाईल.”
दरम्यान, राहुल गांधी यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. काँग्रेस पक्षाने त्यांच्या भेटीचा व्हिडीओ ह्या खात्यावर पोस्ट केला आहे. त्यांनी प्रतिनिधित्व, समानता आणि शैक्षणिक न्याय ह्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांशी चर्चा केली. ही चर्चा DUSU अध्यक्षांच्या कार्यालयात पार पडली. त्यांच्या भेटीदरम्यान संपूर्ण परिसर सुरक्षा रक्षकांनी सील केल्यामुळे कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता.
Delhi University objects to Rahul Gandhi’s surprise visit
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर