Viksit Maharashtra-2047 : ‘विकसित महाराष्ट्र-2047’ आराखड्याला मंत्रिमंडळाची मंजुरी; राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी 16 संकल्पना आणि 100 उपक्रम निश्चित

Viksit Maharashtra-2047 : ‘विकसित महाराष्ट्र-2047’ आराखड्याला मंत्रिमंडळाची मंजुरी; राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी 16 संकल्पना आणि 100 उपक्रम निश्चित

विशेष प्रतिनिधी

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्राच्या दीर्घकालीन विकास आराखड्यासाठीचा महत्वाकांक्षी ‘विकसित महाराष्ट्र-2047’ व्हिजन डॉक्युमेंट मंजूर केला आहे. या धोरणात्मक आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट (VMU)’ स्थापन केली जाणार आहे.



हा आराखडा राज्य नियोजन विभागाने तयार केला असून, नागरिकांकडून थेट सूचना आणि मते मागवून त्याचे एआय-आधारित विश्लेषण करण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून तयार होणाऱ्या दस्तावेजात १६ प्रमुख संकल्पना आणि १०० उपक्रमांचा समावेश असेल. यांचा केंद्रबिंदू प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासनावर आधारित महाराष्ट्र घडविण्यावर असेल.

‘विकसित महाराष्ट्र 2047’ या उपक्रमातून राज्यातील आर्थिक, सामाजिक, तांत्रिक आणि पर्यावरणीय प्रगतीसाठी एकत्रित दिशा निश्चित केली जाणार आहे. युनिटमार्फत विविध विभागांमध्ये समन्वय साधून महत्त्वपूर्ण प्रकल्प, धोरणात्मक गुंतवणूक आणि नागरिकाभिमुख सुधारणा राबवल्या जातील.

बैठकीत सोलापूर–तुळजापूर–उस्मानाबाद नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली असून, राज्य सरकारकडून ५० टक्के आर्थिक वाटा म्हणून अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

सामान्य प्रशासन विभागाच्या प्रस्तावानुसार ‘राजशिष्टाचार’ उपविभागाचा विस्तार करण्यात आला आहे. आता सचिव पदाचे नवीन नामकरण असेल —
“Secretary (Protocol, FDI, Diaspora Affairs and Outreach)”.

यासोबतच परकीय थेट गुंतवणूक (FDI), परदेशस्थ नागरिकांचे विषय (Diaspora Affairs) आणि आंतरराष्ट्रीय संपर्क (Outreach) या तीन नवीन कार्यासनांची निर्मिती करण्यात आली असून, त्यासाठी आवश्यक पदनिर्मितीलाही मंजुरी देण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच वरिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. यासोबतच शासकीय अभियोक्ता कार्यालय आणि आवश्यक पदनिर्मितीसाठीही परवानगी देण्यात आली आहे.

वाशिम जिल्ह्यातील सुविदे फाउंडेशन, रिसोड यांना मौजे करडा (ता. रिसोड) येथील २९.८५ हेक्टर जमीन नाममात्र भाडे दराने (₹१ प्रति वर्ष) पुढील ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याचे नुतनीकरण मंजूर करण्यात आले आहे. या जमिनीवर शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील उपक्रम

Viksit Maharashtra-2047’ Vision Plan Approved by Cabinet; 16 Key Concepts and 100 Initiatives Charted for State’s Holistic Development

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023