विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : Pakistan Army Chief भारत कठोर पाऊल उचलणार या धास्तीने पाकिस्तानमध्ये घबराट पसरली असताना लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या वल्गना सुरूच आहेत. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर किंवा अखंडतेवर गदा आली, तर पाकिस्तान संपूर्ण लष्करी ताकदीने उत्तर देईल, अशी वल्गना त्यांनी केली आहे.Pakistan Army Chief
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव कमालीचा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी भारताला इशारा दिला आहे. रावळपिंडी येथील जनरल मुख्यालयात झालेल्या १५व्या नॅशनल वर्कशॉप बलुचिस्तानच्या सहभागींशी संवाद साधताना जनरल मुनीर यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले की, “पाकिस्तान शांतता राखू इच्छितो, पण जर आमच्या सन्मानाला धोका निर्माण झाला तर कोणतीही कारवाई करण्यात आम्ही मागे-पुढे पाहणार नाही.”
या वक्तव्याच्या काही तासांपूर्वीच पाकिस्तान सरकारने दावा केला होता की, भारत लष्करी कारवाईसाठी तयारी करत आहे, अशी त्यांच्याकडे “विश्वसनीय गुप्त माहिती” आहे.
दरम्यान, बलुचिस्तानमधील अंतर्गत सुरक्षाविषयक परिस्थितीवरही जनरल मुनीर यांनी भाष्य केले. त्यांनी बलुच लोकांच्या नावावर दहशतवाद पसरवणाऱ्या टोळ्यांना देशद्रोही ठरवत त्या बलुच समाजाच्या अभिमानावर डाग असल्याचे म्हटले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने थेट पाकिस्तानवर सीमेपलीकडून दहशतवाद (क्रॉस बॉर्डर टेररिझम) चालवत असल्याचा आरोप केला आहे. यास उत्तर म्हणून भारताने सिंधू जलकरार निलंबित करणे, अटारी सीमारेषा बंद करणे, पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द करणे यासारखी कठोर पावले उचलली आहेत.
पाहलगाममधील हल्ला हा २०१९ मधील पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्वात भीषण हल्ला मानला जात आहे. यात २६ निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले. भारत सरकारने लष्कराला कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले असून, वेळ, स्थळ आणि पद्धत निवडण्याचे अधिकार सुरक्षा दलांना दिलेआहेत.
महत्वाच्या बातम्या
- Pakistan पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई; पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी
- Neelam Gorhe : पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना चौकशीचे निर्देश
- Sonu Nigam : सोनू निगमवर गुन्हा दाखल, कन्नडमध्ये गाणे गायचा आग्रह अन् म्हणाला यामुळेच पहलगाममध्ये युद्ध झालं…
- Ajit Pawar : तर अजित पवार, एकनाथ शिंदे हाेऊ शकतात मुख्यमंत्री… संजय राऊत यांचा दावा