विशेष प्रतिनिधी
पुणे : अजित पवार गोचिडासारखे अर्थ खात्याला चिकटले आहेत, अमोल मिटकरी बाजारू विचारवंत आहेत आणि फडतूस आहेत, अशी जहरी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. मी जर बोललो तर मिटकरी आणि त्यांचा आका अजित पवार यांच्या अंगावर कपडे राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. Laxman Hake
लक्ष्मण हाके यांनी पत्रकारांशी बोलताना अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, गेल्या 20 वर्षापासून अर्थ खात्याला चिटकून बसलेल्या अजित दादांनी अर्थ खात्यात पीएचडी केलीय का? ते तर साधे कोंबडीच्या पोल्ट्री फार्म वाले आहेत. त्यांचे राजकारण सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता असे आहे. ते सामाजिकदृष्ट्या असंवेदनशील आहेत. यांनी भटके विमुक्त आणि मागास महामंडळाला 50 पैसे सुद्धा त्यांनी दिले नाहीत. ज्या आण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटी रुपयांचा निधी दिली जातो. पण ओबीसींच्या महामंडळाता दोन पाच कोटी अजित पवार देऊ शकत नाहीत. अजित पवार हे पोल्ट्री चालवणारा माणूस, काकांच्या जीवावर ते पुढे आले, अशी सडकून टीका केली आहे. Laxman Hake
लक्ष्मण हाके म्हणाले, मुळात सगळे सरकारमध्येच आहेत. महाराष्ट्राला विरोधकच उरला नाही. काँग्रेसमधीलही काही माणसे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे हे सगळे भाजपमध्ये सामील झाले आहेत असे हाके म्हणाले. दुर्दैव हे आहे की सामान्य माणूस आवाज उठवू शकत नाही त्याचे मरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत. Laxman Hake
लक्ष्मण हाके यांना समाजाने फॉर्च्यूनर गाडी भेट दिली आहे. यावरून अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना लक्ष्मण हाके म्हणाले, गाडी हे माझे साधन आहे, साध्य नाही. कोणाला टीका करायची ती करू द्या. अमोल मिटकरी बाजारू विचारवंत आहे. मिटकरी अजित पवारांच्या घरी झाडू मारतात, त्याबद्दल त्यांना आमदारकी दिली. आम्ही जर मिटकरीला त्याच भाषेत उत्तर दिले तर त्याचेही कपडे राहणार नाहीत आणि अजित पवारांचे देखील कपडे राहणार नाहीत.
मिटकरी तू विधानपरिषदेचा सदस्य आहे. ओबीसीवर कधी बोलला का? अजित पवारांनी ओबीसीसाठी एखादे तरी वसतिगृह दिले का? असा सवाल हाके यांनी उपस्थित केला.




















