Rafale aircraft: राफेल विमानही मेक इन इंडिया, टाटा समूह तयार मुख्य ढाचा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Rafale aircraft शत्रूंना धडकी भरवणाऱ्या राफेल या लढाऊ विमानांसाठी लागणारे महत्त्वाचे भाग आता टाटा समूहाकडून भारतात तयार केले जाणार आहेत. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स ही राफेल लढाऊ विमान फ्यूजलेजचे (fuselage) म्हणजेच मुख्य ढाच्याचे उत्पादन करणार आहे. यासाठी डसॉल्ट एव्हिएशन आणि भारतातील टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड (TASL) यांच्यात करार करण्यात आला आहे. यावेळी डसॉल्ट एव्हिएशनसोबत 4 उत्पादन हस्तांतरण करार केल्याची माहिती गुरुवारी (5 जून) कंपनीने दिली आहे.

हैदराबादमध्ये एक विशेष उत्पादन केंद्र उभारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे भारताच्या मेक इन इंडियाच्या उपक्रमाला चालना मिळणार आहे. तसेच, या करारांसोबतच देशाची संरक्षण स्वयंपूर्णतेकडे वाटचालही अधिक वेगाने होणार आहे. विशेष म्हणडे टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दसॉल्ट एव्हिएशनबरोबर झालेल्या कराराबद्दल माहिती दिली आहे. विशेष बाब म्हणजे या विमानांचे असे भाग पहिल्यांदाच फ्रान्सच्या बाहेर बनवले जाणार आहेत.Rafale aircraft

फ्यूजलेज म्हणजे विमानाचा मुख्य ढाचा असतो. यामध्ये पुढचा आणि मुख्य असे दोन भाग असतात. त्यामध्ये इंजिन, पंख किंवा विमानाचा शेवटचा भाग म्हणजेच शेपटी याचा समावेश नसतो. त्याच्या संरचनेमुळे त्याला पाठीचा कणा देखील म्हणतात, जो पुढच्या ते मागच्या बाजूला पसरतो आणि उर्वरित विमानाशी जोडलेला असतो. राफेलसारख्या लढाऊ विमानाचा फ्यूजलेज बनवणे ही भारताच्या विमान वाहतूक डिझाइन आणि उत्पादन क्षेत्रातील एक मोठी कामगिरी आहे. विमानाचा हा भाग किंवा शरीर एक लांब पोकळ नळी आहे जी विमानाच्या सर्व भागांना एकत्र जोडते. विमानाचे वजन कमी करण्यासाठी फ्यूजलेज पोकळ असते. विमानाच्या इतर भागांप्रमाणे, फ्यूजलेजचा आकार सहसा विमानाच्या मिशननुसार ठरवला जातो. फ्यूजलेज हा शब्द लॅटिन शब्द फ्यूसस किंवा “स्पिंडल” पासून आला आहे, जो विमानाच्या मध्यवर्ती नळीच्या आकाराच्या भागाच्या आकाराचे वर्णन करतो. विमानाच्या या भागात प्रवासी आणि त्यांचे सामान ठेवले जाते. सर्वात पुढच्या भागात कॉकपिट देखील समाविष्ट आहे, जिथे पायलट आणि सह-पायलट विमान नियंत्रित करतात.

Rafale aircraft also made in India, Tata Group prepared the main structure

महत्वाच्या बातम्या