विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर त्यांच्या वडिलांच्या पवनराजे निंबाळकर हत्येच्या खटल्याचा निकाल ‘बाजूने लावून देण्याचे’ आमिष दाखवण्यात आले, असा आराेप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. Omraje Nimbalkar
पत्रकार परिषदेत बाेलताना राऊत म्हणाले सुमारे २० वर्षांपूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा अंतिम निकाल कोर्टात लागणार आहे. ‘आम्ही हा निकाल तुमच्या बाजूने लावून देतो, तुम्ही आमच्या शिवसेनेत (शिंदे गटात) या’, असे थेट आमिष आणि दबाव ओमराजेंवर टाकण्यात आला आहे. हा निकाल बदलण्यासाठी या खटल्याचा निकाल मुद्दाम २० तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे! काल रात्री ओमराजे निंबाळकर यांना पुण्यातून नेण्यासाठी खास विशेष विमान देखील पाठवण्यात आले होते.
राऊत म्हणाले, पक्षांतरासाठी केवळ यंत्रणांचाच नाही, तर पैशांचाही अफाट वापर होत आहे. ऑपरेशन टायगर’च्या नावाखाली लोकशाहीचा खून सुरू आहे. ठाकरे गटाच्या खासदारांना फोडण्यासाठी तब्बल १५-१५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. भाजप जाणीवपूर्वक शिवसेना तोडण्याचा प्रयत्न करत आहे. जर अशाच प्रकारे खासदार खरेदी केले जाणार असतील, तर या देशात निवडणुका घेण्याचा अर्थच काय?द्या गुरुवारी सकाळी ११ वाजता शिवसेनेच्या संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली असून, सध्या आमचे सर्व खासदार एकत्र आहेत आणि आमचा पक्षप्रमुख (उद्धव ठाकरे) एकच आहे.
शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत म्हणाले, आमचे चिन्ह आणि पक्षाचा मुख्य खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अद्याप आमच्या एकाही खासदाराने अधिकृतपणे पक्ष सोडत असल्याचे म्हटलेले नाही. परंतु, दिल्लीत ज्या काही घडामोडी आणि अफवा सुरू आहेत, त्या लक्षात घेऊन आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून सर्व खासदारांना ‘व्हिप’ जारी केला आहे.
MP Omraje Nimbalkar Was Offered Inducements to Defect, Alleges Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
- Nagpur : कर्करोगावरील उपचार, संशोधनासाठी नागपूरला हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रोन प्रकल्प
- महाराष्ट्र पोलिसांना मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, केंद्र सरकारकडून योजना मंजूर
- मुठा नदीपात्र स्वच्छता अभियानात पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
- शपथा आणि शिवबंधन नव्हे, माणुसकीच्या बंधनाने खासदार टिकतात, नवनाथ बन यांचा टोला