विशेष प्रतिनिधी
चेन्नई : सुप्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम (Makkal Needhi Maiam – MNM) पक्षाचे अध्यक्ष कमल हसन Kamal Hasan सध्या कन्नड भाषिकांच्या विरोधात बोलत आहेत. तरीही द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाकडून त्यांना राज्यसभा बहाल केली जात आहे.
हसन यांनी तामिळनाडूमधून राज्यसभा निवडणुकीसाठी आपला नामनिर्देशन अर्ज अधिकृतरित्या दाखल केला. चेन्नई येथील राज्य सचिवालयात हा कार्यक्रम पार पडला. कमल हसन यांच्या अर्ज दाखल कार्यक्रमावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाचे अध्यक्ष एम.के. स्टालिन, उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टालिन आणि MNM पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
कमल हसन यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर आपला अर्ज सादर करत राज्यसभेच्या निवडणुकीच्या औपचारिक प्रक्रियेत प्रवेश केला. ही निवडणूक येत्या १९ जून २०२५ रोजी पार पडणार आहे. राज्यसभेतील तामिळनाडूमधील सहा जागांसाठी ही निवडणूक होत असून, DMK कडून तीन उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. त्यातील एक महत्त्वाची उमेदवारी कमल हसन यांना देण्यात आली आहे.
नामनिर्देशन दाखल केल्यानंतर कमल हसन यांनी मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांच्यासोबतचा फोटो आपल्या X (माजी ट्विटर) अकाऊंटवर शेअर करत, “राज्यसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करताना माझं नेतृत्व केल्याबद्दल आणि मला शुभेच्छा दिल्याबद्दल मी तमिळनाडूचे मुख्यमंत्री, डिएमकेचे अध्यक्ष आणि माझे मित्र एम.के. स्टालिन यांचे मनःपूर्वक आभार मानतो,” असे ट्विट केले. त्यांच्या या पोस्टला मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया मिळत आहेत.
- Devendra Fadnavis : आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयमी जीवनशैली आवश्यक, देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टालिन यांनीही सकाळीच X वरून फोटो पोस्ट करत कमल हसन आणि इतर उमेदवारांनी केलेल्या नामनिर्देशन प्रक्रियेचा क्षण चाहत्यांपर्यंत पोहोचवला.
कमल हसन यांची ही उमेदवारी काहीशा वादग्रस्त पार्श्वभूमीवर समोर आली आहे. काही आठवड्यांपूर्वी त्यांनी कन्नड भाषेच्या उगमावर एक वक्तव्य केलं होतं, ज्यावरून कर्नाटकातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यामुळे त्यांच्या नामनिर्देशन प्रक्रियेत काहीसा उशीर झाला होता. मात्र, आज त्यांनी मोठ्या दिमाखात आपला अर्ज दाखल करून या सर्व चर्चा मागे टाकल्या आहेत.
कमल हसन यांची ही उमेदवारी DMK व MNM यांच्यात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात झालेल्या युतीचा एक भाग आहे. त्या वेळी झालेल्या करारानुसार, MNM ला एक राज्यसभा जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याचीच अंमलबजावणी करत DMK ने कमल हसन यांची उमेदवारी अधिकृत केली आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी तामिळनाडूत निवडणूक होत आहे. यात DMK ने आपले तीन उमेदवार नामनिर्दिष्ट केले आहेत, त्यात कमल हसन यांचा समावेश असून, उर्वरित जागांसाठी इतर मित्रपक्ष किंवा विरोधकांकडून उमेदवार उभे राहणार आहेत
कमल हसन यांचे हे संसदेतले पहिले पदार्पण ठरणार आहे. याआधी त्यांनी २०१८ मध्ये MNM पक्षाची स्थापना केली होती. २०२१ मध्ये विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला.
DMK supports Kamal Haasan, who is embroiled in Kannada controversy, files nomination for Rajya Sabha in presence of Stalin
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी