निवडणुका हरल्याने नैराश्यातून राहुल गांधींचा बोगस आख्यान रचण्याचा डाव, जे.पी. नड्डा यांचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा लेख निवडणूकांमागून निवडणुका हरल्याने आलेले नैराश्य आणि हताशीमुळे बोगस आख्यान रचण्याचा डाव आहे, असा हल्लाबोल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला आहे J.P. Nadda

महाराष्ट्रातील साल २०२४ च्या विधानसभा निवडणूकांत घोटाळा झाला, निवडणूक आयोगाच्या मदतीने निकाल फिक्स केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. जे.पी. नड्डा यांनी एक पोस्ट करत आरोप फेटाळून लावले आहेत. नड्डा यांनी म्हटले आहे की कांग्रेस पार्टी त्यांच्या वागणुकीमुळे निवडणूकांमागून निवडणूका हरत आहे. आत्मपरीक्षण करण्याऐवजी, ते विचित्र आणि हेराफेरीचे षडयंत्र रचतात. सर्व तथ्य आणि आकड्याकडे ते दुर्लक्ष करतात. कोणताही पुरावा नसताना स्वायत्त आणि वैधानिक संस्थांना बदनाम करतात असतात. केवळ बातम्यांमध्ये राहण्यासाठी तथ्य मांडण्याऐवजी खोटे बोलतात.

नड्डा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय की वारंवार उघडकीस येऊनही ते निर्लज्जपणे खोटे पसरवत आहेत. बिहारमध्ये त्यांचा पराभव निश्चित असल्याने ते असे करत आहेत. लोकशाहीला अशा नाटकाची गरज नाही तर सत्याची गरज आहे.

Rahul Gandhi’s plan to create a bogus narrative out of frustration after losing the elections, J.P. Nadda’s attack

महत्वाच्या बातम्या