बजरंग पुनियानं आपला पद्म पुरस्कार परत केलेलाय. हा पुरस्कार आपण तेव्हाच स्वीकारणार, जेव्हा आपल्याला न्याय मिळेल. कोणताही पुरस्कार हा आपल्या बहिणी आणि मुलींच्या सन्मानापेक्षा मोठा नसतो. आता संजय सिंहांचं निलंबन झालंय, पण जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोवर पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं पुनियानं स्पष्ट केलंय. क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघ बरखास्त झाला, हे खेळाडूंचं यश आहे. यासंदर्भात आता ऑलिम्पिक महासंघ समिती स्थापन करून कुस्ती महासंघाचं कामकाज पाहणार आहे.