विशेष प्रतिनिधी
पुणे : पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगर येथील इरफान शेख या तरुणाचा वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला. इरफान गेल्या दोन वर्षापासून एअर इंडिया मध्ये कामाला लागला होता. अत्यंत मनमिळावू असलेला इरफान नुकताच ईद साठी घरी येऊन पुन्हा कामाला गेला होता. त्याच्या जाण्याने त्यांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे. त्याचा मृतदेह लवकरात लवकर मिळावा अशी मागणी त्याचे नातेवाईक करत आहेत. Air India plane crash
अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादचे पोलीस उपायुक्त कानन देसाई यांनी ही माहिती दिली आहे. विमानामध्ये एकूण २४२ जण प्रवास करत होते, त्यापैकी एक ब्रिटीश नागरिक चमत्कारीकरित्या बचावला आहे. देसाई यांनी सांगितलेला आकडा हा विमानातील प्रवाशांपेक्षाही खूप जास्त आहे. यामुळे यात बीजे मेडिकल कॉलेजच्या इंटर्न डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. या घटनेत १२ क्रू मेंबर्स होते. तर महाराष्ट्रातील ९ प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील इरफान शेख हा क्रू मेंबर म्हणून कर्तव्यावर गेला होता. असा झाला अपघात विमान समुद्रसपाटीपासून ६२५ फूट उंचीवर गेल्यावर इंजिन बंद पडले आणि विमान खाली कोसळले. विमानतळावरून उड्डाण केल्याने विमानतळाची हद्द ओलांडून विमान पुढे गेले होते. रहिवाशी भागात असलेल्या बीजे मेडिकल क़ॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीवर हे विमान आदळले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Irfan Sheikh from Pimpri Chinchwad dies in Air India plane crash
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी