विशेष प्रतिनिधी
तेहरान : इस्त्रायली हवाई दलाने थेट राजधानी तेहरानमधील इराणच्या सरकारी प्रसारमाध्यम आयआरआयबीच्या (IRIB) मुख्यालयावर बॉम्बहल्ला केला. विशेष म्हणजे, हा हल्ला घडला तेव्हा IRIB वर थेट कार्यक्रम प्रसारित केला जात होता. त्या क्षणाचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. Israeli attack
व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, कार्यक्रम सुरू असताना अचानक मोठा आवाज होतो. संपूर्ण स्टुडिओ धुळीच्या लोटांनी व्यापला जातो, आणि निवेदक घाबरून स्टुडिओमधून बाहेर पळतो. काही क्षणांत थेट प्रक्षेपण थांबते आणि चॅनेलवर प्री-रेकॉर्डेड कार्यक्रम दाखवला जातो. इराणी अधिकाऱ्यांनी नंतर याची पुष्टी केली की IRIB च्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यामुळे थेट प्रक्षेपण तातडीने थांबवावे लागले आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. Israeli attack
हल्ल्यानंतर इस्त्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी एक आक्रमक वक्तव्य करत म्हटले, “इराणी प्रचार आणि चिथावणीचं केंद्र लवकरच नाहीसं होईल.” त्याचबरोबर इस्त्रायली लष्कराने या हल्ल्यापूर्वी तेहरानमधील नागरिकांना इशारा दिला होता की, हल्ला होऊ शकतो आणि त्यांनी तत्काळ परिसर रिकामा करावा. मात्र, अनेकांना हा इशारा वेळेत पोहोचला नाही, असा आरोप स्थानिक माध्यमांनी केला आहे.
या हल्ल्यामुळे संपूर्ण इराणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला ‘आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग’ असे संबोधले असून, त्याचा बदला घेतला जाईल, असा इशारा इराणी नेतृत्वाने दिला आहे. दुसरीकडे, इस्त्रायलने हे हल्ले ‘स्वसंरक्षण’ म्हणून जायज ठरवत म्हटले की, इराणच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या दुष्प्रचाराला थांबविणे आवश्यक होते.
दरम्यान, या संघर्षामुळे संपूर्ण पश्चिम आशियात तणाव वाढला आहे. पाकिस्तानने आपल्या बलुचिस्तान सीमावर्ती भागात खबरदारी घेत इराणसोबतची सीमा तात्पुरती बंद केली आहे. अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या जागतिक शक्तींनी या वाढत्या संघर्षाबाबत चिंता व्यक्त करत दोन्ही देशांना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे.”
सध्या इराण आणि इस्त्रायल यांच्यात हल्ले आणि प्रतिहल्ल्यांची मालिका सुरू असून, हे युद्ध संपूर्ण प्रदेशात फैलावण्याचा धोका निर्माण झाला आहे. दोन्ही देश एकमेकांवर ड्रोन, क्षेपणास्त्र आणि सायबर हल्ले करत असल्याचे वृत्त आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, राजधानी तेहरानमध्ये अनेक ठिकाणी आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर जगभरातून प्रतिक्रिया उमटत असून संयुक्त राष्ट्रसंघाकडून शांततेचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
Thrilling footage of Israeli attack, bomb attack caught on camera during live broadcast
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी