विशेष प्रतिनिधी
नाशिक : Chhagan Bhujbal राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मृत्यूची खोटी बातमी व्हायरल करणाऱ्या यूट्युबवरील एका चॅनलवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Chhagan Bhujbal
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाल्याची बातमी “हेल्पलाईन किसान” या डिस्प्ले नावाने सुरू असलेल्या @Nana127tv या यूट्युब चॅनलने त्यांच्या चॅनलवरून प्रसिद्ध केली. अज्ञात संशयिताने मुद्दाम भुजबळ यांच्या निधनाची खोटी टॅगलाईन वापरून ही पोस्ट शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास युट्युबवर अपलोड केली. ही बनावट पोस्ट सुमारे सव्वा लाख लोकांपर्यंत पोहोचली, त्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होऊन अफवा पसरण्याची आणि जनक्षोभ उसळण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळे शहराच्या शांततेला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत या यूट्युब चॅनलवर गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक शहर आयुक्तालयाच्या विशेष शाखेचे अंमलदार सुनील बहारवाल यांनी शहर सायबर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, छगन भुजबळ यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल करणाऱ्या यूट्युब चॅनेलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष शाखेकडून सोशल मीडियावर सतत ऑनलाइन सर्फिंग करून आक्षेपार्ह पोस्टवर करडी नजर ठेवली जाते. सर्फिंगदरम्यान, एका वृत्तवाहिनीचा लोगो वापरून “मंत्री छगन भुजबळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन” अशा आशयाखाली एक व्हिडिओ लिंक निदर्शनास आली. लिंक तपासून पाहिली असता, त्यामध्ये प्रत्यक्षात रंजनीताई बोरस्ते यांच्या निधनाची बातमी होती, ज्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी युट्युबवर श्रद्धांजली अर्पण केली होती. सोशल मीडियावर अशा प्रकारे दिशाभूल करणारी आणि खळबळजनक माहिती पसरवल्याबद्दल पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे
Case registered against YouTube channel for spreading fake news about Chhagan Bhujbal’s death
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी