Devendra Fadnavis : बीड लैंगिक शोषण प्रकरणाची एसआयटी चौकशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Devendra Fadnavis : बीड लैंगिक शोषण प्रकरणाची एसआयटी चौकशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बीड येथील कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन मुलीच्या झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणाची संभाव्य व्याप्ती तथा संवेदनशीलता लक्षात घेऊन सरकारने या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय घेईल. एका वरिष्ठ दर्जाच्या महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात ही समिती कालबद्धपणे आपला तपास करून या गुन्ह्याचा छडा लावेल. या प्रकरणी कुणालाही पाठिशी न घालता पीडित मुलींना न्याय देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी विधानसभेत केली.



राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांनी बीडमधील लैंगिक शोषणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. यावर
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले की, बीडमध्ये कोचिंग क्लासेसला येणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यातील एका पीडित मुलीने व तिच्या आईने हिंमतीने या प्रकरणात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाची वस्तुस्थिती बाहेर आली. या अंतर्गत पोस्को कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन्माननीय सदस्याने या प्रकरणी काही मुद्दे उपस्थित केलेत. या प्रकरणी आरोपींची दोनच दिवसांची कोठडी का मागण्यात आली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याची चौकशी केली जाईल. या प्रकरणी बीडसह संपूर्ण राज्यात रोष पसरला आहे. कारण, या प्रकरणाची व्याप्ती अधिकची असू शकते. एक मुलगी हिंमतीने पुढे आली, पण ही घटना अनेक मुलींसोबत घडल्याचा संशय आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती व संवेदनशीलता लक्षात घेऊन सरकारने या प्रकरणाची वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एक एसआयटी चौकशी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. एसआयटीच्या माध्यमातून या गुन्ह्याचा तपास केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, या प्रकरणाची व्याप्ती कुठपर्यंत आहे? कुणाचा वरदहस्त आहे का? याला राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या वेगवेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे का? आदी तपास या प्रकरणी केला जाईल. त्यातून पीडित मुलींना योग्य न्याय मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे मी सभागृहाला व सदस्यांना ग्वाही देतो की, या प्रकरणातील एसआयटी कालबद्ध तपास करून या गुन्ह्याचा छडा लावेल. पीडित मुलींना न्याय देईल. तसेच अशा प्रकारच्या नराधमांना कठोर शिक्षा मिळेल. एवढेच नाही तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही शिक्षा मिळेल अशी व्यवस्था केली जाईल.

बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलातील एका कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन प्राध्यापकांकडून लैंगिक छळ करण्यात आला होता. यावरुनच राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी आक्रमक भूमिका घेत सखोल चौकशीची मागणी केली. बीडमधील ही घटना गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षक विजय पवार, प्रशांत खटावकरला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्यांची सखोल चौकशी व्हावी, असे आमदार चेतन तुपे यांनी मागणी केली. कोणी तरी गब्बर राजकारणी पाठीशी म्हणून यातील आरोपी फक्त 3 दिवस पोलिस कस्टडी मागितली का? एक मुलगी पुढे आली पण असा किती मुलींवर अत्याचार केला. यावर महिला आयपीएस अधिकारी मार्फत चौकशी करावी, एसआयटी करावी,” अशी मागणी त्यांनी केली. आमदार तुपे यांच्या या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.

SIT probe into Beed sexual abuse case, announced by Chief Minister Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023