विशेष प्रतिनिधी
मुंबई : इंदापूर तालुक्यातील युवा नेते प्रवीण माने यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे प्रवीण माने यांनी सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. माने यांच्या रूपाने भाजपला बारामती लोकसभा मतदारसंघात लढण्यासाठी नवीन चेहरा मिळाला आहे.
भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माझ्या वैयक्तिक आयुष्यातील सुवर्ण अक्षराने लिहावा असा आजचा क्षण आहे. रविदादांनी मला भारतातील आणि विश्वातील सर्वात मोठ्या पक्षात सामील करून घेतले, त्याबाबत त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदींच्या विचाराने प्रेरित होऊन मी प्रवेश करत असल्याचे प्रवीण माने यांनी सांगितले.
सोनई उद्योग समूहाचे मालक असलेले माने पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आहेत. एकत्रित राष्ट्रवादी असताना ते राष्ट्रवादीचे नेते होते. राष्ट्रवादी फुटल्यावर कधी दादा तर कधी साहेबांच्या पक्षात होते. . नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना विधानसभेचे तिकीट नाकारले आणि त्यांच्या जागी राज्याचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली. त्यावेळी प्रवीण माने यांनी इंदापूर विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली होती. या निवडणुकीत त्यांना चाळीस हजाराच्या आसपास मते मिळाली. अपक्ष निवडणूक लढविल्यापासून ते शरदचंद्र पवार पक्षापासून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीपासूनही दूर गेले होते.
BJP gets a young face to contest from Baramati, big businessman joins the party
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी