विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : गेल्या काही दिवसांपासून कट्टर हिंदुत्ववादी भूमिका मांडणारे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. ही धमकी त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे आली असून, याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ हे बुधवारी (दि. २ जुलै) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मार्केटयार्ड चौक परिसरात असताना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून एक धमकीचा टेक्स्ट मेसेज प्राप्त झाला. या मेसेजमध्ये “संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा” असा थेट जीवे मारण्याचा इशारा देण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, शिरसाठ यांनी तत्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत सदर मेसेजबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक फौजदार अमिना शेख करत आहेत.
संग्राम जगताप गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे चर्चेत आहेत. नुकत्याच त्यांच्या काही विधानांमुळे ते वादग्रस्त ठरले होते. ते म्हणाले होते की, औरंगजेबाची पैदाईश भारतीय नव्हती. त्याची वंशावळ परकीय होती. त्यामुळे जो भारतातला आणि महाराष्ट्रातला मुस्लिम धर्मीय आहे, त्याला औरंगजेबाची विचारसरणी मान्य होऊ शकत नाही. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे लोक कधीच भारतीय मुस्लिम होऊ शकत नाही. त्यामुळे याचाही डीएनए टेस्ट करावा लागणार आहे की हा कुठली व्यक्ति आहे, असं वादग्रस्त विधान जगताप यांनी केलं आहे.
MLA Sangram Jagtap receives death threat
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी