विशेष प्रतिनिधी
मुंबई : मी शेतकऱ्यांसाठी 40 वर्ष लढलो आहे. शेतकऱ्यांची एक हजार वेळा माफी मागेल, पण मी यांची माफी मागणार नाही, असे भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत बोलताना आक्रमक होऊन सांगितले. Babanrao Lonikar
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधान व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. काल या प्रकरणी काँग्रेस सदस्य नाना पटोले यांचे दिवसभरासाठी निलंबन झाले होते. त्यानंतर विरोधकांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला होता. या प्रकरणी आजही विरोधक आक्रमक झाले होते. लोणीकर यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिले. मी जे बोललो नाही ते मी बोललो हा आरोप केला. ह्यात राजकारण आहे असा दावा त्यांनी केल्यावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला व जोरदार घोषणाबाजी केली.
विरोधकांना उत्तर देताना लोणीकर म्हणाले, दोन दिवस माझ्या नावाचा उल्लेख केला जात आहे. हा माझा हरकतीचा मुद्दा आहे. जे मी आयुष्यात कधी बोललो नाही. 40 वर्ष मी राजकारणात आहे. मी शेतकरी विरोधी वक्तव्य केल्याचे म्हटले जात आहे. पण मी असे काही बोललोच नाही. काही लोक राजकारण करत आहेत. माझ्या मृत्यूनंतर माझे हाड सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातलं सरकार शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणं, शेतकऱ्यांना मदत करणं ही सरकारची जबाबदारी असून आमचं सरकार ती पार पाडेलंच. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार आहे. मात्र विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करु नये.
सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत. सरकार चर्चेपासून पळ काढणार नाही. विरोधी पक्षांना त्यांच्या उद्याच्या ठरावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी आहे. Babanrao Lonikar
शेतकऱ्यांच्या अडचणींची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कोणतीही अडचण असो, सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं आहे आणि राहणार आहे. आम्ही केवळ बोलत नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवतो. शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं हित साधणं, त्यांचे प्रश्न सोडवणं हे सरकारच्या धोरणात सर्वोच्च प्राधान्यानं आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना एकटं पडू देणार नाही, असे आश्वासन अजित पवारांनी दिले.
Babanrao Lonikar is aggressive in the Assembly
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी