विशेष प्रतिनिधी
पुणे : कोंढवा परिसरात बुधवारी सायंकाळी एका २५ वर्षीय तरुणीवर घरात घुसून एका अनोळखी इसमाने बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने कुरिअर बॉय असल्याचे भासवत पीडितेच्या घरात प्रवेश केला. तिच्या चेहऱ्यावर पेपर स्प्रे फवारला आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. इतके करून तो निघून जाण्यापूर्वी पीडितेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढून “मजा आली, पुन्हा येईन” असा संदेशही सोडून गेला. girl raped
बुधवारी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता ही घटना घडली. पीडिता आपल्या भावासोबत कोंढवा येथील एका सोसायटीमध्ये राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने डिलिव्हरीबॉय असल्याचे सांगून सोसायटीत प्रवेश मिळवला. तो पीडितेच्या फ्लॅटवर गेला आणि तिला कुरिअर देण्याचे सांगितले. पीडितेने कुरिअर आपले नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर, त्याने नाकारल्याची नोंद घेण्यासाठी स्वाक्षरी करण्यास सांगितले.
पीडितेने सुरक्षेचा दरवाजा उघडताच आरोपीने तिला पेपर स्प्रे फवारून गोंधळात टाकले आणि आत घुसून जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर पीडितेच्या मोबाईलचा वापर करत त्याने स्वतःचा सेल्फी काढला आणि “मजा आली, पुन्हा येईन” असा मजकूर टाईप करून ठेवला.
या सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे आणि गेटवर फोटोसह प्रवेश नोंदणीची सक्ती असतानाही आरोपीने सहज प्रवेश कसा केला, हा तपासाचा मुख्य मुद्दा ठरत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गेटवरील रजिस्टर तपासण्यास सुरुवात केली आहे.
कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेची वैद्यकीय तपासणी केली गेली आहे. पीडितेला सध्या वैद्यकीय उपचारांसह समुपदेशनही दिले जात आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ही घटना पूर्णपणे पूर्वनियोजित होती. आरोपीने सोसायटीचा नकाशा, सुरक्षा व्यवस्था आधीच अभ्यासलेली असल्याचा संशय आहे. तपासासाठी डिजिटल पुरावे, मोबाईल डेटा आणि परिसरातील इतर कॅमेऱ्यांचे फुटेज गोळा केले जात आहेत.”
या संतापजनक घटनेमुळे पुणेकरांमध्ये तीव्र नाराजी असून महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. विविध महिला संघटनांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्वरित आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे.
कोंढवा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कुणाकडे या प्रकरणासंबंधी कोणतीही माहिती असेल तर त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
Shocking incident in Pune! 25-year-old girl raped by man disguised as courier boy; Forced entry into house by spraying pepper spray
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी