विशेष प्रतिनिधी
पुणे : Rohit Pawar मी विचारांसोबत आहे, जनतेसोबत आहे. मी लढणार आणि जिंकणार आहेआहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.Rohit Pawar
पवार यांच्याविरोधात ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा , 2002 अंतर्गत पुरवणी आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले. पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडताना रोहित पवार म्हणाले की, “मी कारखाना घेतला तेव्हा शिखर बँकेवर राजकीय नेते नव्हते. ईडीने ज्यांच्यावर गुन्हा दाखल होता त्या 97 पैकी बहुतांश नेते हे आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत, भाजपसोबत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यातील लोकांवर कोणतीही कारवाई होत नाही. पण, माझ्याविरोधात आता ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. एका ठराविक काळात हे आरोपपत्र दाखल होणे गरजेचे असते. त्यामुळे हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून आम्ही त्याचीच वाट पाहत होतो. पळून जाणारे गेले आहेत, पण मी मात्र विचारांसोबत आहे, जनतेसोबत आहे. पळून जाणारे गेले आहेत, पण मी मात्र विचारांसोबत आहे, जनतेसोबत आहे. मी लढणार आणि जिंकणार आहे,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
“2012 साली बारामती ऍग्रोन कन्नड सहकारी कारखाना खरेदी केला होता. त्याप्रकरणी ईडीने माझ्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. 2011 साली राज्य सहकारी बँकेवर प्रशासक बसवण्यात आले. राज्य सहकारी बँकेकडून कन्नड सहकारी करण्यासाठी तीनवेळा टेंडर काढण्यात आले. तिसऱ्यावेळी बारामती ऍग्रोने 50.02 कोटी रुपयांना विकत घेण्यात आला. ईडीने 97 लोकांवर गुन्हा दाखल केला होता. त्यात माझे नाव नव्हते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी टेंडर काढण्यात आल्यानंतर हा कारखाना खरेदी करण्यात आला. पण, ज्या 97 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता ते राहिले बाजूला आणि मी ज्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी टेंडर काढण्यात आल्यानंतर हा कारखाना खरेदी केला होता, माझ्या एकट्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न ईडीच्या अधिकाऱ्यांकडून झाला. माझे नाव FIR मध्ये नसताना मुद्दाम टाकण्यात आले आहे. अधिकाऱ्यांना आदेश पाळावा लागतो.” असा दावा त्यांनी केला आहे.
I will fight with my thoughts… and win, Rohit Pawar is aggressive after ED files chargesheet
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार