विशेष प्रतिनिधी
मुंबई : महायुती सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांनी ऐतिहासिक भरारी पकडला आहे. या प्रकल्पांपैकी एक म्हणजे ‘यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत भारतातील सर्वात लांब बोगद्याचे आणि सर्वाधिक उंच पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. Fadnavis government
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी केली. ते म्हणाले, “हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठीही अभिमानास्पद आहे. मिसिंग लिंक पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे प्रवास अधिक जलद, सुलभ आणि सुरक्षित होईल. या प्रकल्पांतर्गत ९ किमी लांब व २३ मीटर रुंद असा देशातील सर्वात लांब बोगदा तयार होत आहे हा बोगदा समृद्धी महामार्गावरील सर्वात लांब बोगद्याचा विक्रम मोडणार आहे. याशिवाय १८५ मीटर उंचीचा पूल देखील उभारण्यात येत असून, तो देशातील सर्वात उंच पूल ठरणार आहे. Fadnavis government
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पारंपरिक घाटमार्ग टाळता येणार असून, खिंडीतील वळणं आणि वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ किमान ३० मिनिटांनी कमी होणार असून, इंधनाची बचत आणि प्रदूषणातही घट होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) या प्रकल्पाची अंमलबजावणी करत असून सध्या प्रकल्पाचे ९०% पेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पुढील काही महिन्यांत पूर्ण होणार आहे.
पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही न थकता काम करणाऱ्या अभियंते, कामगार, पर्यवेक्षक आणि कंत्राटदार टीमचे विशेष कौतुक केले. त्यांनी प्रकल्पाच्या दर्जावर समाधान व्यक्त करत म्हटले, अभियांत्रिकी क्षेत्रातील हा एक चमत्कार आहे .
या दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे तसेच वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक तज्ञ उपस्थित होते.
Another record of Fadnavis government, the longest tunnel in the country is being created on the Mumbai-Pune Expressway
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार