विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : ‘आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है’. त्यामुळे पैशांची चिंता नाही. एखादी बॅग तुमच्याकडे (अधिष्ठाता )पाठवून देऊ”, अशी मिश्कील टिप्पणी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. Sanjay Shirsat
समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत संजय शिरसाट यांच्या बाजूला बॅग दिसत आहे. त्या बॅगेत पैशांच्या नोटा दिसत आहेत. पण संबंधित व्हिडीओ हा मॉर्फ केल्याचा दावा संजय शिरसाट यांच्याकडून करण्यात आला आहे. याच व्हिडीओवरुन शिरसाट मिश्किल वक्तव्य केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे एका कॅन्सरवर उपचार करणाऱ्या रुग्णालयात संजय शिरसाट यांनी रुग्णालयाच्या डीनला उल्लेख करत पैशांची चिंता करायची नाही म्हटलं. “पैशांसाठी काही अडले असे समजण्याचे काहीच कारण नाही. पैसे देणारे आम्हीच आहोत.
संजय शिरसाट म्हणाले, रुग्णालयात रुग्ण आल्यानंतर आपण त्याच्यासोबत चांगल्याप्रकारे वर्तवणूक केली, त्याला स्मितहास्य दाखवत त्याच्याशी बातचित केली तर त्यालादेखील बरं वाटेल. तुला काही होणार नाही, असा शब्द तुमच्या मुखातून निघाला तर त्याच्यासाठी तो देवाच्या मुखातून आलेला शब्द असेल, त्याला समाधान वाटेल. त्याचा परिमाण बघा काय होतो. आपल्याला माहिती आहे, कॅन्सरच्या आजारावर ठोस एकही औषध नाही. आपण फक्त उपचार करु शकतो.
आता संशोधनातून वेगवेगळी माहिती समोर येत आहे. त्यामुळे काही दिवसांनी कॅन्सर सुद्धा नॉर्मल आजार वाटेल. पण त्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल. त्यामुळे जे रुग्ण येतात त्यांच्याशी सकारात्मक बोला. जेवढा होईल तेवढा प्रयत्न तुम्ही करता त्याबद्दल दुमत नाही. पण काम करताना सगळ्या महत्त्वाचं म्हणजे त्याला दिलासा देणं महत्त्वाचं आहे.
Sanjay Shirsat said, ‘No worries about money, our name is very popular these days’
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार