विशेष प्रतिनिधी
इंदापूर: Dattatray Bharane राज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत आहे. त्यामुळे इतर विकासकामांना निधी मिळण्यास विलंब होत असल्याची खंत क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.Dattatray Bharane
इंदापूरमधील घरकुलाच्या धनादेश वाटप कार्यक्रमात बोलताना भरणे म्हणाले की, मी सातत्याने पाठपुरावा करत असतो, मग मी कुठेही असलो तरी इंदापूरसाठी अधिकाधिक निधी मिळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र सध्या लाडकी बहीण योजनेमुळे निधी वितरणात उशीर झालेला आहे. आता मात्र परिस्थिती सुधारत आहे.
दत्तात्रय भरणे म्हणाले की, इतर जिल्ह्यांमध्ये निधी कमी मिळतो, मग इंदापूरलाच कसा मिळतो, असा सवाल विचारला जातो. म्हणूनच मी बातम्या देत नाही, व्हिडीओ वा शो करत नाही. विरोधक व्हॉट्सॲपवर काय टाकतात याचा फरक पडत नाही. इंदापूरची जनता अतिशय समजूतदार आहे.
यापूर्वीही भरणे यांनी लाडकी बहीण योजनेमुळे इतर विकासकामांमध्ये अडथळा येत असल्याचे सूचित केले होते. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा ताण आला आहे .त्यामुळे इतर विकास कामांमध्ये निधी वाटप विलंबित झाल्याच्या चर्चांना आता अधिकृत छाप मिळाल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांसाठी 410.30 कोटींचा निधी वळवण्यात आला असल्याची माहिती समोर आली होती. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. याआधी लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला होता.
Delay in distribution of funds due to Ladki Bhain scheme, Minister Dattatray Bharane regrets
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार