विशेष प्रतिनिधी
फलटण : Jaykumar Gore ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर खरमरीत शब्दांत टीका करत थेट इशारा दिला आहे. “देवेंद्र पावले नसते, तर तुम्ही आत गेलाच असता. मी माफ केलं म्हणून तुम्ही जेलमध्ये जाण्यापासून वाचलात. त्याची जाणीव ठेवा आणि आता तरी वागणूक सुधारावी,” असा सल्ला देत जयकुमार गोरेंनी निंबाळकरांवर थेट निशाणा साधला. Jaykumar Gore
फलटणमधील एका कार्यक्रमात बोलताना गोरेंनी भावनिक आणि आक्रमक भाषेत आपल्या विरोधकांवर हल्लाबोल केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “असत्य कटकारस्थानांचा आनंद क्षणिक असतो. शकुनी मामाने दुर्योधनाच्या विनाशात जो आसुरी आनंद घेतला, तसाच आनंद काही जणांनी आम्हाला त्रास देताना घेतला. पण आता तेच कटकारस्थान त्यांच्यावर उलटले आहे. कोणाचे पाय धरलेत, हे मला ठाऊक आहे.”
यावेळी त्यांनी रामराजेंच्या वागणुकीवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, “परमेश्वराच्या रूपाने तुम्हाला देवेंद्र पावले. मी क्षमा केली म्हणून तुम्ही जेलमध्ये जाण्यापासून वाचलात. पण ती क्षमा विसरू नका. चुकलात तर त्याची किंमत तुम्हालाच मोजावी लागेल. नीट वागा, सुधारा.”
या भाषणात जयकुमार गोरे यांनी आपल्या संघर्षाचा दाखलाही दिला. “माझ्यावर २९ केसेस दाखल झाल्या, पण मी कधीच कोणाच्या दारात गेलो नाही, मान वाकवली नाही. रामराजेंनी जे डाव रचले, तेच आता त्यांच्या विरोधात गेले आहेत,” असे सांगत त्यांनी आत्मविश्वास दाखवला.
Jaykumar Gore’s Stern Warning to Ramraje
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार