वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात 1676 पानांचे आरोपपत्र, आरोपींना मदत करणाऱ्यांचाही समावेश

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात 1676 पानांचे आरोपपत्र, आरोपींना मदत करणाऱ्यांचाही समावेश

Vaishnavi Hagavane

विशेष प्रतिनिधी

पुणे : संपूर्ण राज्यात गाजलेल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीने 1676 पानांचे आरोप पत्र सादर करण्यात आले आहे. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर 59 दिवसांनी हे दोषारोप पत्र सादर करण्यात आले आहे. या प्रकरणात सासू, सासरे, पती, नणंद आणि दीर यांच्या छळाला कंटाळून वैष्णवी यांनी 16 मे 2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.  Vaishnavi Hagavane

वैष्णवी हगवणे यांचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होते. तर पती शशांक, सासू लता, नणंद करिष्मा आणि दीर सुशील यांच्यावर या प्रकरणी आरोप करण्यात आले आहेत. हुंड्यासाठी हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीचा अमानुष छळ केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर पूर्ण कुटुंबीयांना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात 59 दिवसांनी 1676 पानांचे आरोप पत्र पोलिसांनी सादर केले आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणात वैष्णवीच्या दहा महिन्यांच्या बाळाची हेळसांड केल्या प्रकरणात नीलेश चव्हाण याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर वैष्णवीचे दहा महिन्यांचे बाळ नीलेश कडे सोपवण्यात आले होते. नीलेश हा वैष्णवीची नणंद करिष्मा हीचा मित्र असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नीलेशचा देखील या आरोपींमध्ये समावेश करण्यात आला आहे. पोलिसांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रात एकूण 11 आरोपींच्या नावाचा उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये आरोपी फरार असताना आरोपींना मदत करणाऱ्यांच्या देखील समावेश आहे.

वैष्णवीच्या मृत्यू नंतर वैष्णवीचा सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे हे दोघे फरार होते. या दोघांना सात दिवस वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यासाठी आसरा देणाऱ्या पाच आरोपींचा देखील याचा समावेश करण्यात आला आहे. हे पाचही आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. तर एकूण सहा जण हे येरवडा तुरुंगातील कोठडीत आहेत.

Vaishnavi Hagavane dowry case, including those who helped the accused

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023