विशेष प्रतिनिधी
जळगाव : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर वादग्रस्त टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या विरोधात भाजपचे चार आमदार एकनाथ खडसे यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. खडसे हे संधी साधू राजकारण करत असून, मंत्री गिरीश महाजन यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप आमदारांनी केला आहे. एकनाथ खडसे यांच्या रंगल्या रात्रीची माहिती आपल्याकडे असल्याचा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे. Mangesh Chavan
एकनाथ खडसे हे कोणत्याही पुरावा शिवाय मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करत आहेत. त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते माध्यमांच्या समोर आणावेत. या उलट एकनाथ खडसे यांच्या रंगल्या रात्रीची माहिती आपल्याकडेही आहेत. त्यांनी म्हटलं तर आपण त्यांच्या मुक्ताईनगर येथे जाऊन ही त्यांना दाखवू शकतो असे थेट आव्हान आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसे यांना दिले आहे.
मंत्री संजय सावकारे यांनीही खडसे हे संधी साधू राजकारण करत असून, मंत्री गिरीश महाजन यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या अशा वागण्याने जिल्ह्यातील विकास कामाच्यावर मोठा परिणाम होत असून, दोन्ही बड्या नेत्यांच्या वादात इतर लहान जिल्हे ही विकास कामात पुढे निघून गेल्याचं सावकरे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसे यांचे एकेकाळचे समर्थक राहिलेले आमादर सुरेश भोळे यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. नाथाभाऊ यांनी भाजपसाठी मेहनत घेतली हे कोणीही नाकारणार नाही. मात्र, त्यांच्यामुळेच पक्ष वाढला असे नाही तर अनेक लहान मोठ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने पक्ष मोठा होत असतो. त्यांनी जसे पक्षाला योगदान दिल्याचे ते सांगतात तसे पक्षाने ही त्यांना खूप काही दिले आहे. हे देखील त्यांनी विसरता कामा नये असे आमदार सुरेश भोळे यांनी म्हटलं आहे. गिरीश महाजन यांच्यावर आरोप करण्यापेक्षा पुरावे द्यायला हवे, अन्यथा उगाच आरोप करु नये.यामुळं जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होत आहे ,हा विषय आता थांबला पाहिजे. विकाससाठी एकत्र येण्याचे आवाहनही सुरेश भोळे यांनी खडसे यांना केले आहे.
खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये होत असलेले आरोप हे थांबायला हवेत. खडसे हे कोणत्याही पुराव्याशिवाय बिन बुडाचे आरोप करत असल्याचे मत आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केले. हे आरोप थांबले पाहिजेत. मंत्री गिरीश महाजन यांनीही याबाबत मौन बाळगले पाहिजे, तरच हा विषय थांबू शकेल असेही आमदार अमोल जावळे यांनी म्हटलं आहे. आपण याला मोठे केले त्याला मोठे केले असे खडसे सांगत असले तरी पक्षांमुळे आणि त्याच्या कर्तृत्वमुळे कार्यकर्ता मोठा होत असतो , असेही त्यांनी खडसे यांना सांगितले आहे.