विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील उद्योग क्षेत्रात कोणत्याही पक्षाच्या लोकांनी दादागिरी केल्यास किंवा कोणी अडचणी आणत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, तरीही कुणी न ऐकल्यास त्यांच्यावर मोकोका दाखल करण्याच्या सूचना दिल्या असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. Ajit Pawar
माहिती तंत्रज्ञानाचे शहर, उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या आणि नामांकित कंपन्या आग्रही आहेत. मात्र आमचीच माणसे घ्या, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही सांगू त्याच दराने काम करा, असा दबाव गुंतवणूक करणाऱ्यांवर टाकला जातो. ही दबावाची मानसिकता न संपविल्यास पुण्याचा विकास होऊ शकत नाही.
उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी हा पुण्याच्या विकासातील दुर्दैवाने सर्वांत मोठा अडथळा आहे,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या आहेत. कोणीही उद्योग क्षेत्रात त्रास देत असेल, गुंडगिरी करत असेल तर त्यावर गुन्हे दाखल करण्यास सांगितले आहे. जर तरीही कोणी वारंवार असे प्रकार करत असेल तर त्यावर संघटित गुन्हेगारीखाली मकोका कारवाई करण्यात येईल.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही असाच इशारा नाशिक येथे बोलताना आम्हाला ब्लॅकमेल केले जात आहे, त्रास दिला जातोय, खंडणी वसूल केली जात आहे’ अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अशा गुंडांवर मोका लावण्याचे आदेश पोलिस यंत्रणेला दिले आहेत. हा गुंड कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर मोकाचीच कारवाई करावी, खालची कारवाई करू नये, असे आदेशित केल्याने उद्योग वर्तुुळात मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.
मागील काही काळापासून नाशिकच्या उद्योग क्षेत्रात गुंडगिरी माजविणाऱ्यांचे कारनामे सातत्याने समोर येत आहेत. गेल्या काही काळापासून स्क्रॅप माफियांनी पुन्हा एकदा डोकेवर काढल्याने, त्यांचा बंदोबस्त करण्याबाबतची मागणी उद्योजकांकडून केली जात आहे. हे गुंड विविध राजकीय पक्षातील असून, त्यांना बड्या राजकारण्यांचे पाठबळ मिळत असल्याचे आतापर्यंत बऱ्याचदा समोर आले आहे. त्यामुळे उद्योजक देखील या गुंडांविरोधात तक्रार करण्यास धजावत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
Ajit Pawar warns that MCOCA will be imposed on bullies in the industrial sector in Pune
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान