विशेष प्रतिनिधी
मुंबई : नांदणी येथील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण गुजरातमधील वनतारा येथे पाठविल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत. एका तरुणाने यावर प्रश्न विचारल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) त्याला त्या हत्तीणीचे लय लागलंय बाबा… तुला एकदा कुठंतरी हत्तीणीवर नेऊन बसवतोच, असा टोला मारला. पण या विषयाचे गांभीर्य लक्षात आल्यावर त्यांनी तू चांगल्या भावनेने बोललास. तू प्राणीप्रेमी असशील म्हणून तू भूमिका मांडलीस, असे म्हणत सावरूनही घेतले.
गेल्या 30 वर्षांपासून अधिक वर्ष शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठातील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण अखेर सोमवारी (ता. 28 जुलै) रात्री गुजरातकडे रवाना झाली. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने मठाची याचिका फेटाळल्यामुळे हत्तीणीला नांदणी पंचक्रोशीतील सर्वधर्मीयांनी पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. पण महादेवीला नांदणीत परत आणण्यासाठी कोल्हापुरातील नागरिकांनी लढा उभारला आहे. तर काही नागरिकांकडून नेतेमंडळींना याबाबत प्रश्न सुद्धा विचारण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना सुद्धा एका कार्यक्रमात एका तरुणाने महादेवीबाबत प्रश्न विचारला.
उपमुख्यमंत्री अजित पवार एका कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी अजित पवारांचे भाषण सुरू असताना एका तरुणाने मधेच माधुरी अर्थात नांदणीतील महादेवी हत्तीणीबाबत मुद्दा उपस्थित केला. या तरुणाने “दादा, आमची माधुरी हत्तीण परत आणा, तिला वनताऱ्याला (गुजरात) नेलंय.” असे म्हटले. पण सुरुवातीला अजित पवारांपर्यंत त्या तरुणीचा आवाज पोहोचला नाही. त्यामुळे त्या तरुणाने पुन्हा म्हटले की, “आमची कोल्हापूरची हत्तीण आहे, तिला वनताऱ्याला नेलंय. लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.” असे पुन्हा या तरुणाकडून विचारण्यात आले. ज्यावर, “तू माधुरी हत्तीणीबद्दल बोलतोयस ना? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तिला वनताऱ्याला पाठवण्यात आले आहे,” असे अजित पवारांनी म्हटले.
प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी कायदा आहे. आपण संविधानाने चालतो, आपण आपला देश कायद्याने चालवतो, तुलाही आठवत असेल प्राणी-पक्ष्यांसाठी कायदा सुरू केला आहे. शेवटी तुला आणि मला जसा जगण्याचा अधिकार आहे, तसाच तो प्राणी व पक्ष्यांनाही आहे. त्यामुळेच त्या हत्तीणीला नेले आहे. म्हणूनच ती हत्तीण गेली बाबा. त्या हत्तीणीचे लय लागलंय बाबा… तुला एकदा कुठंतरी हत्तीणीवर नेऊन बसवतोच, असा टोला अजित पवारांनी लगावला. परंतु, तू चांगल्या भावनेने बोललास. तू प्राणीप्रेमी असशील म्हणून तू भूमिका मांडलीस, त्याबद्दल तुझं अभिनंदन, असेही अजित पवारांनी म्हटले.
I’ll Make You Ride an Elephant Someday,” Ajit Pawar’s Quirky Reply on Mahadevi the Elephant Query
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान