विशेष प्रतिनिधी
मुंबई : Harshvardhan Sapkal पुण्यातील कोथरूड पोलीसांनी तीन तरुणींच्या घरात घुसून त्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले. त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. ज्या पोलिसांनी हा प्रताप केला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? या पोलिसांवर ऍट्रॉसिटी कलमाखाली तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.Harshvardhan Sapkal
सपकाळ म्हणाले की, एका महिलेला मदत केल्याच्या कारणावरून या तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींच्या घरात घुसून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. या मुजोर पोलिसांना कोण पाठिशी घालत आहे? पुण्याचे पोलीस आयुक्त काय खुर्चीवर बसून झोपा काढतात काय? कोणाच्या दडपणाखाली पोलीस काम करत आहेत,? तीन तरूण मुलींवर पोलीस अत्याचार करतात आणि कारवाई होत नाही. एफआयआर नोंदवण्यास कोणत्या मुहुर्ताची वाट पहात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याच्या पालकमंत्र्यांनी जातीने या प्रकरणी लक्ष घालून मुजोर पोलिसांवर कठोर कारवाई करावी.
पुण्यात ड्रग्जचा काळाबाजार खुलेआम सुरु आहे, कोयता गँगचा हैदोस सुरु आहे, त्याला आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. पुण्यात दादागिरी वाढली आहे असे खुद्द मुख्यमंत्रीच जाहीरपणे सांगत आहेत. पण कारवाई मात्र करत नाहीत, असा हतबल मुख्यमंत्री काय कामाचा? पुणे पोलीसांनी सर्वसामान्य लोकांना कायद्याचा नाहक बडगा दाखवण्याऐवजी पुण्यातील अवैध धंदे व गुन्हेगारी मोडीत काढण्याचे काम करण्याची गरज आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
Harshvardhan Sapkal demands immediate action against police officers who abuse young women in casteist terms
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान