विशेष प्रतिनिधी
मुंबई : दादरमधील कबुतर खाना (Dadar Kabutar Khana) परिसरात यापुढे कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाकडून कामय ठेवण्यात आला आहे.मात्र शनिवारी सोशल मीडियावर एक व्यक्ती कबुतरांना धान्य घालत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. वाहनावर ट्रे बसवून त्यावर धान्य टाकून कबुतरांना खाऊ घालत होता. महेंद्र संकलेचा यांच्यावर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
लालबागमध्ये वास्तव्यास असलेले महेंद्र संकलेचा हे कबुतरांना खाद्य घालण्यासाठी दादर परिसरात (Dadar Kabutar Khana) त्यांची कार घेऊन आले. या कारवर त्यांनी कबुतरांसाठी ट्रे बसवला होता. ते संपूर्ण दादरमध्ये ती कार फिरवू लागले. त्यानंतर त्यांनी त्यांची कार दादर कबुतर कबुतरखान्याजवळ उभी केली. या घटनेचा व्हिडीओ लोकांनी बनवला. त्यानंतर ते तिथून निघून गेले. पुन्हा त्यांनी कबुतरखान्याजवळ कार उभी केली. यावेळी एका व्यक्तीने तुम्ही हे न्यायालयाच्या विरोधात जाऊन करत असल्याचे त्यांना म्हटले. पण यावेळी महेंद्र संकलेचा यांनी अरेरावी केली. मी माझ्या कारवर कबुतरांना खाद्य देतो, याची सरकार आणि न्यायाधीशांना काय प्रॉब्लेम आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इतकेच नाही तर आणखी 12 गाड्या येणार आहेत, असेही संकलेचा यांनी सांगितले. मी माझ्या कारवर कबुतरांना खाद्य देण्यासाठी हे तयार केले आहे आणि या ट्रेमध्येही पोलीस, सरकार खाद्य टाकू नका म्हणत असतील, तर त्यांना काय अडचण आहे? असे संकलेचाने म्हटले होते.
संकलेच्या यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणाच व्हायरल झाला. अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच संकलेचा यांच्यावर न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या या सगळ्या प्रकाराची दखल घेत मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. पोलिसांनी महेंद्र संकलेचावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संकलेचा याची कार जप्त केली असून, याप्रकरणी त्याला नोटिसही बजावली आहे.
Dadar Kabutar Khana : Action taken against those who feed pigeons grain by placing trays on cars
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला