विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Gaikwad शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने महाराष्ट्रात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही, असा पलटवार शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.Sanjay Gaikwad
गेल्या काही दिवसांमध्ये महायुती सरकारच्या अनेक मंत्र्यांवर विविध आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये मंत्री योगेश कदम, मंत्री माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्या नावाचा समावेश आहे. तर सरकारमध्ये अन्य काही मंत्री सुद्धा आहेत, जे वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहिले आहेत. त्यामुळे वादग्रस्त आणि कलंकित मंत्र्यांविरोधात सोमवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने महाराष्ट्रात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी कोणी लुंगी बनियान घातली, कोणी पत्ते खेळले तर एकाने नाचही केला.Sanjay Gaikwad
संजय गायकवाड यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, उबाठाच्या वतीने जे आंदोलन करण्यात आले, तो सर्व रिकाम पक्ष राहिला आहे. त्यांना काही काम राहिलेलं नाही. त्यामुळे ते माझी कॉपी करू शकत नाहीत, कारण मी ओरिजनल आहे. इतकंच काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही, असे वक्तव्य संजय गायकवाड यांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
संजय गायकवाड म्हणाले की, विरोधी पक्षाने लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवायला हवा. पण ते नको त्या गोष्टीवर आंदोलन करतात. राज्यात फक्त 16 जागा देऊन जनेतेने त्यांना त्यांची जागा दाखविली आहे. जे कधी मातोश्रीमधून बाहेर पडत नव्हते, ते आता बाहेर रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे आता तरी त्यांनी सुधारावं. कारण आम्ही आता महायुतीमध्ये आहोत. भाजपाला त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि मी माझ्या पक्षाचं काम करतोय. सर्व पक्षांना आपापलं काम करण्याचा अधिकार आहे, असेही संजय गायकवाड म्हणाले.
कलंकित मंत्र्यांविरोधातल्या आंदोलनासाठी शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांनी आज अनोखी वेशभूषा केली होती. शिवाजी पार्क येथे आंदोलनकर्त्यांनी नकली नोटा असलेल्या पैशांची बॅग भरून आणली. काही आंदोलनकर्ते बनियन घालून आणि टॉवेल लावून आल्याचे पाहायला मिळाले. तसेच संजय गायकवाड यांनी आमदार निवासस्थानात केलेल्या मारहाणीवरून एका व्यक्तीने लुंगी आणि हातात ग्लब्स घालून संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त केला. तर काही कार्यकर्त्यांनी आपल्या सोबत पत्ते देखील आणले होते. यावेळी ओम फट स्वाहाच्या घोषणा देखील करण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे भरत गोगावले, संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन यांचे राजीनामे घ्यावे, या मागणीसाठी आज आंदोलन करण्यात आले.
Even Uddhav Balasaheb Thackeray’s father won’t be able to copy me; Sanjay Gaikwad’s controversial statement
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला