विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसने माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचे पुनर्वसन केले असून आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने माेठी जबाबदारी दिली आहे. मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मलिक यांच्यावर सोपविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. Nawab Malik
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा समीर भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजीनामा दिला होता. तेव्हापासून मुंबई अध्यक्षपद रिक्त आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसने मुंबईसाठी अध्यक्ष नेमला नाही. मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, आमदार सना मलिक- शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, राजू घुगे यांची तर निमंत्रित म्हणून दक्षिण जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, उत्तर – पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष अजय विचारे, उत्तर – मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष अर्शद अमीर, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव आदींचा समावेश आहे.
कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन मंत्री असलेल्या नवाब मलिक यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी नोव्हेंबर 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले होते. मलिकांच्या कंपनीने 1993 च्या मुंबई ब्लास्टमध्ये आरोपी असलेल्या लाेकांकडून जमीन खरेदी केली हाेती. ही जमीन दाऊद इब्राहिमशी संबंधीत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर नवाब मलिक मनी लाँड्रिंग प्रकरणात वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनावर तुरुंगाबाहेर आले हाेते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला हाेता.
Nawab Malik Rehabilitated, Assigned Key Role in Mumbai Municipal Elections
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला