विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईच्या फोर्ट येथील कबुतर खान्यामध्ये कबुतरांना खाद्य खायला घालणाऱ्या व्यावसायिकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चेतन ठक्कर असे या व्यावसायिकाचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कबुतरांना खायला घालण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. जैन समाजाने मुंबई उच्च न्यायालयाच्या विरोधात जात मुंबईतील अनेक भागामध्ये कबुतरांना खायला घालणे सुरूच ठेवले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर प्रसिद्ध दादर कबुतर खान्यासोबतच मुंबईतील अन्य काही कबुतर खाने बंद करण्यात आले आहेत.
6 ऑगस्टला आक्रमक झालेल्या जैन समाजाने दादर कबुतर खान्यावरील ताडपत्री हटवली. मात्र, पुन्हा एकदा न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला असून कबुतरांना खाद्य घालणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांकडून या कारवाईला सुरुवात झाली आहे.
चेतन ठक्कर यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 223 आणि 271 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एम आर ए मार्ग पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. कबुतर खान्यांमध्ये कंट्रोल फिडींग करण्यापूर्वी पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु, या व्यावसायिकाकडन अशी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. ज्यामुळे चेतन ठक्कर या व्यावसायिकाला कबुतरांना खायला घातल्या प्रकरणी अटक करण्यात आली. पण काही वेळानंतर नोटीस देऊन सोडण्यात आले.
बुधवारी कबुतरखान्यांच्या बंदीसंदर्भातील महत्त्वाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पार पडली. यावेळी न्यायालयाने कबुतर खान्यांवरील बंदी आणि कबुतरांना कुठेही खायला घालणे यावरील बंदी कायम ठेवली आहे. पण या प्रकरणी आता तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करून त्यानंतर त्यासंदर्भातील माहिती न्यायालयासमोर सादर करेल. तर, याबाबतचा संपूर्ण निर्णय आता महापालिका आयुक्त घेतील. पण ज्या लोकांना कबुतरांना खायला घालायचे आहे, अशा लोकांनी अर्ज केल्यानंतर त्यांच्याशी आयुक्त बोलतील आणि मग याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. पण तुर्तास तरी कबुतरांना खाद्य घालण्यास घातलेली बंदी न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आली आहे. 20 ऑगस्टपर्यंत समितीची अधिसूचना जारी करून समितीने चार आठवड्यांत अहवाल सादर करावा, असे मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
A case has been registered in Mumbai against a businessman who Kabutar khana
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला