विशेष प्रतिनिधी
मुंबई : कबुतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात, हे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांना खायला घालू नये, असे न्यायालयाने सांगितलेले असताना त्यांना खायला घालण्यात येत असेल तर, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. Raj Thackeray
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कबुतरांना खायला घालण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. जैन समाजाने मुंबई उच्च न्यायालयाच्या विरोधात जात मुंबईतील अनेक भागामध्ये कबुतरांना खायला घालणे सुरूच ठेवले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर प्रसिद्ध दादर कबुतर खान्यासोबतच मुंबईतील अन्य काही कबुतर खाने बंद करण्यात आले आहेत.
राज ठाकरे म्हणाले, कबुतर खाना बंदी प्रकरणात दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आहे आणि त्यामुळे मला असे वाटते की न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावे लागेल. त्यामुळे जैन मुनींनी सुद्धा याबाबत विचार करणे गरजेचे आहे. जर न्यायालयाने बंदी घातली आहे, तर ती गोष्ट केली गेली पाहिजे.
मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खायला घालण्यावर बंदी घातलेली असताना सुद्धा जर धर्माच्या नावाखाली त्यांना खायला घालण्यात येत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. कारण या गोष्टींसाठी एकाने सुरुवात केली की, बाकीचे सुद्धा तसंच वागायला सुरुवात करणार. त्यानंतर मग उच्च न्यायालयाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यायचे कशाला? त्यामुळे काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.
या प्रकरणावरून जी आंदोलन होत आहेत, त्यामध्ये सुरुवातीला जैन लोकांनी आंदोलन केली. मग मराठी लोकांनी आंदोलन केली. ज्यावेळी त्या लोकांनी आंदोलन केले, तेव्हा पोलिसांनी कारवाई करायला हवी होती. जी कारवाई झाली नाही. पण हे सर्व लोढांसारखी माणसे आहेत, जी मधे येत आहेत. ते खरं तर मंत्री आहेत, ते कोणत्या समाजाचे मंत्री नाही. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचा आणि न्यायालयाचा मान राखला पाहिजे. ज्या लोकांनी सुऱ्या आणल्या होत्या, पोलिसांनी त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे, असेही राज ठाकरे यांनी सुनावले.
जे मराठी लोक बुधवारी आंदोलनासाठी गेली होती. त्यांची धरपकड करण्यात आली. पत्रकारांना सुद्धा मारले, त्यामुळे हा नेमका काय प्रकार सुरू आहे, हे अजून कळलेले नाही, सरकारला नेमके काय हवे आहे? हे सुद्धा कळलेले नाही. कारण पहिलं हिंदी आणून पाहिले, तेव्हा त्यांचे काही झाले नाही. आता हे कबुतर आणली आहेत. त्यामुळे आता माहीत नाही, पुढे आता यापुढे कोणत प्राणी येतील, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला.
Action should be taken against those who feed pigeons despite court orders, Raj Thackeray’s clear stand
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला