Sanjay Raut : संजय राऊत चिठ्या काढणारा पोपट, शहाजीबापू पाटील यांचा टोला

Sanjay Raut : संजय राऊत चिठ्या काढणारा पोपट, शहाजीबापू पाटील यांचा टोला

Sanjay Raut

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Sanjay Raut  संजय राऊत चिठ्या काढणारा पोपट आहे, त्यांनी काढलेली प्रत्येक चिठ्ठी खोटी निघाली आहे. हा पोपट उद्धव ठाकरेंनी लवकरच पिंजऱ्यात बंद करावा, असा टोला माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी लगावला आहे.Sanjay Raut

पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे यांना खऱ्या अर्थाने नेते केले ते आनंद दिघे यांनी केले आहे. तर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना आशीर्वाद दिले आहेत. संजय राऊत यांनी उगाच कुणाचे नाव घेऊन कुणाला मोठे पण देण्याचा प्रयत्न करु नये. ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या मनपा निवडणुकीत काहीही परिणाम होणार नाही. मुंबई, ठाणे नाशिकसह इतर मनपावर महायुतीचा विजय होईल, आणि महायुतीचा महापौर बसेल हे निश्चित आहे.Sanjay Raut

शहाजीबापू पाटील म्हणाले की, संजय राऊत दिल्लीला गेले तेव्हा त्यांना कुठे बसवण्यात आले हे आपण पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी धनखड यांच्या विषयावर बोलूच नये. तुमची लायकी दिल्लीत काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. संजय राऊत हे बेडकाचा फुगून झालेला बैल असे विखारी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.

शहाजीबापू पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे ठाण्याचे नेते आहेत की महाराष्ट्राचे नेते आहेत, हे गेल्या निवडणुकीत त्यांनी दाखवून दिले आहे. 2024 ची निवडणूक एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात लढली गेली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. आतापर्यंत कुठल्याही राज्यात बहुमत मिळाले नाही असे बहुमत राज्यात महायुतीला मिळाले. यावरुन जनतेने त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसून आले आहे.

राऊतांनी घरातून बाहेर पडावं

शहाजीबापू पाटील म्हणाले की, संजय राऊत सकाळी 9 वाजता झाडाखाली येत पत्रकार परिषद घेतात आणि साडे नऊ वाजता घरात जातात. यांना महाराष्ट्र काय माहिती आहे.खेड्यापाड्यात फिरा म्हणावं तग तुम्हाला जनता शिंदे यांच्याबद्दल काय म्हणता हे समजेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याइतके राऊत मोठे नाही. ते आमच्या मतावर खासदार झाले आहेत.

शहाजीबापू पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी स्वत:चे राजकीय अस्तित्व पणाला लावत उठाव केला. याची दखल जगातील 33 देशांनी घेतली होती. शिंदेंना मुख्यमंत्री मिळाले होते ते त्यांच्या कष्टामुळे मिळाले होते नशिबामुळे नाही. ते 24 तास जनतेसाठी उपलब्ध असतात, प्रत्येकाचे काम करण्यासाठी त्यांची धडपड असते, असे म्हणत त्यांनी मंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut is a lottery drawing parrot, a joke of Shahajibapu Patil

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023