विशेष प्रतिनिधी
मुंबई : वारकरी परंपरेचा सन्मान करु शकत नाही तर किमान अपमान तरी करु नका. पण मौलाना शरद पवारांच्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार, अशी टीका भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मांसाहाराबाबत वक्तव्यावर केली आहे. Supriya Sule
शनिवारी दिंडोरीतील खेडगावमध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे,
यावर तुषार भोसले म्हणाले, कोणी काय खावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पिढ्यानुपिढ्या शुद्ध शाकाहाराची परंपरा जपणाऱ्या आम्हा वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाला तुम्ही मांसाहार केलेला चालतो, हे बोलणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. तुम्ही वारकरी परंपरेचा सन्मान करु शकत नाही तर किमान अपमान तरी करु नका. पण मौलाना शरद पवारांच्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार?
सुप्रिया सुळे या शनिवारी दिंडोरीच्या खेडगावमध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी मांसाहाराच्या सेवनाबाबत वक्तव्य केले. त्या म्हणाल्या की, माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, आम्ही आमच्या पैशांनी मटण खातो, आम्ही कोणाचे मिंधे नाही. खाल्लं तर काय पाप केलं का? 50 वर्षांपूर्वी शरद पवार एका मुलीवर थांबले. स्वतःचं ऑपरेशन केलं, मात्र पत्नीचे नाही, हे खरं पुरोगामित्व आहे.
BJP Slams Supriya Sule Over Meat Consumption Remark: “What Else Can You Expect From Moulana Sharad Pawar’s Daughter?”
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींची चोरी पकडल्याचा राग, काँग्रेसकडून पत्रकार शिव अरोर यांच्याविरुद्ध एफआयआर
- शक्ती संवाद : महिला सक्षमीकरणाच्या बरोबरच भारतीय संघराज्य व्यवस्थेतला सुसंवाद वाढविण्याचाही सक्षम प्रयोग!!
- Jarange Supporters : जरांगे समर्थक आक्रमक, लक्ष्मण हाकेंना चपलेचा प्रसाद देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस
- … म्हणून शरद पवारांचा उपराष्ट्रपतीपदासाठी राधाकृष्णन यांना पाठिंब्यास नकार