विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत तब्बल 26 लाख 34 हजार बोगस लाभार्थी सापडल्याचा मोठा घोटाळा उघड झाला आहे. या अपात्र लाभार्थ्यांनी दरमहा 1500 रुपयांचा निधी घेत राज्याच्या तिजोरीवर प्रचंड भार टाकला, असे तपासणीत स्पष्ट झाले आहे.या पार्श्वभूमीवर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी थेट “मग योजना बंद करू का?” असा सवाल केला. Ajit Pawar
तपासणीत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 2 लाख 4 हजार तर ठाणे जिल्ह्यात 1 लाख 25 हजार 300 बोगस लाभार्थी आढळले आहेत. योगायोगाने हे दोन्ही जिल्हे अनुक्रमे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पालकमंत्रीपदाखाली येतात.
राज्यातील एकूण 2 कोटी 63 लाख नोंदणीदारांपैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या होत्या. मात्र, सखोल तपासणीत अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील अनेक सदस्य, तसेच पुरुषांनीही महिलांच्या नावाने अर्ज केल्याचे उघड झाले. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अहवालानंतर हा प्रकार प्रकाशात आला.
सरकारने तत्काळ कारवाई करत जून महिन्यापासून या अपात्र लाभार्थ्यांचा निधी थांबवला आहे. तसेच, पुढील हप्त्यापूर्वी सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसीद्वारे पडताळणी होणार आहे. यानंतर केवळ खऱ्या पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
Then should we close the scheme?” Ajit Pawar’s question on the bogus beneficiary case
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींची चोरी पकडल्याचा राग, काँग्रेसकडून पत्रकार शिव अरोर यांच्याविरुद्ध एफआयआर
- शक्ती संवाद : महिला सक्षमीकरणाच्या बरोबरच भारतीय संघराज्य व्यवस्थेतला सुसंवाद वाढविण्याचाही सक्षम प्रयोग!!
- Jarange Supporters : जरांगे समर्थक आक्रमक, लक्ष्मण हाकेंना चपलेचा प्रसाद देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस
- … म्हणून शरद पवारांचा उपराष्ट्रपतीपदासाठी राधाकृष्णन यांना पाठिंब्यास नकार