विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray आम्ही हिंदुत्वाचा पवित्र भगवा घेऊन पुढे जात आहोत. वाटेत स्वतःला वाघ म्हणवणारे अनेक काळे मांजरे आडवी येतात. गणराया, त्या अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त तूच कर, नाहीतर त्यांचा बंदोबस्त करायला आम्ही शिवसैनिक आहोतच, अशी गणपतीच्या चरणी प्रार्थना करत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.Uddhav Thackeray
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांनी पक्षाच्या शाखा भेटी सुरू केल्या आहे. आज त्यांनी मुंबईतील शिवसेना शाखेला भेट दिली. शिवसेनेच्या शाखेत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उध्दव ठाकरे म्हणाले, गेले दोन तीन वर्ष सतत प्रसारमाध्यमांतून येते की, इकडे शिवसेनेला धक्का, तिकडे धक्का. एकदा जाऊनच बघू किती धक्के बसलेत. असे धक्के देणारे अनेक जण आले आणि अनेकजण गेले. पण शिवसेनेला कुठेतरी कदाचित धक्का बसला असेल, पण धोका झालेला नाही. अनेकांनी धोके देण्याचे अनेक प्रयत्न केले. यानंतही ते होतील. पण जोपर्यंत तुमची तटबंदी मजबूत आहे. तोपर्यंत धक्का आणि धोके देणाऱ्यांची डोकी फुटतील, पण शिवसेना फुटणार नाही.Uddhav Thackeray
आता गणपती उत्सव आहे. त्यानंतर पितृपक्ष येईल. पितृपक्ष मी आपलाच मानतो. कारण माझा पक्ष हा पितृपक्षच आहे. शिवसेनेची स्थापना माझ्या पित्यानेच केलेली आहे. ज्यांच्याकडे काही आगा-पिछा नाही, त्यांना सगळ्या चोऱ्या कराव्या लागतात, अशी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली.
कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन करत उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या वॉर्डात मतदारयादीत मतचोरी होते का? मतचोर घुसलेत का? प्रत्येक गटप्रमुख आणि प्रत्येक कार्यकर्त्याने बघायचे आहे. घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही, ते बघा. नाहीतर, निवडणुकीच्या दिवशी आपल्यात जे मतदार नाहीत, त्यांच्या नावाने बोगस मतदान होते. काही ठिकाणी दुबार, तिबार मतदान होते. आता डोळ्यात तेल घालून घरोघरी मतदारयादी तपासा.
मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 40-42 लाख बोगस मतदार घुसवले गेल्याचा आरोपही त्यांनी केला. हे घुसलेले कोण आहेत? ते बघा. त्यांना मतदान करू देऊ नका. आगामी निवडणुकीत आपल्या बाजुने मतांचा पाऊस कसा पडेल ते बघा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Ganaraya, take control of inauspicious cats, Uddhav Thackeray attacks Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींची चोरी पकडल्याचा राग, काँग्रेसकडून पत्रकार शिव अरोर यांच्याविरुद्ध एफआयआर
- शक्ती संवाद : महिला सक्षमीकरणाच्या बरोबरच भारतीय संघराज्य व्यवस्थेतला सुसंवाद वाढविण्याचाही सक्षम प्रयोग!!
- Jarange Supporters : जरांगे समर्थक आक्रमक, लक्ष्मण हाकेंना चपलेचा प्रसाद देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस
- … म्हणून शरद पवारांचा उपराष्ट्रपतीपदासाठी राधाकृष्णन यांना पाठिंब्यास नकार