विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nitesh Rane सुप्रिया सुळे यांनी हिंदू धर्मासारखं इतर धर्मासाठी असं काही बोलून किंवा करून दाखवावं. कारण दुसऱ्या धर्मासाठी अशी भाषणं केली तर चिरफाड होईल. त्यामुळे ही मस्ती फक्त आमच्या हिंदू धर्माबद्दल बोलताना होते. परंतु त्यांनी ही मस्ती करू नये, असा सूचक इशारा नितेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांना दिला.Nitesh Rane
शनिवारी दिंडोरीच्या खेडगावमध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, मी रामकृष्ण हरीवाली आहे. फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी मटण खाते. परंतु मी त्यांच्यासारखी खोटं बोलत नाही. कारण मी खालेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझे आई-वडील, सासू-सासरे, नवरा असे सर्व आमच्या पैशाने मटण खातो. आपण कोणाला मिंदे नाही, जे आहे डंके की चोट पर आहे, दिलं खोल कर चलो. त्यामुळे मटण खाते तर खाते आणि खाल्लं तर काय पाप केलं? मी मटण खाते, पण माळ घालत नाही, त्यामुळे अजून मटण खाण्याचा मोह होतो. परंतु ज्या दिवशी माळ घालेल, त्या दिवशी मटण खाणं सोडून दिलं असे समजा, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली होती.Nitesh Rane
याबाबत नितेश राणे म्हणाले की, हिंदू धर्माची हीच विशालता आहे की, कोणी मटण मासे खावे यावर कोणाची कसलीही बंदी नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे सातही दिवस मटण खात असल्या तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु सुप्रिया सुळे लव जिहादचं स्वागत करतात आणि त्या हिंदू धर्म पांडुरंगाच्या बाबतीत वक्तव्य करून कोणाला खुश करायचा प्रयत्न करत आहेत, हे जगजाहीर आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
सुप्रिया सुळे जर आमच्या मंदिरात जाताना अशा पद्धतीने अपमानित शब्द वापर असतील तर वारकरी सांप्रादयासह प्रत्येकाने रोष व्यक्त केला पाहिजे, असे आवाहन राणे यांनी केले.
Nitesh Rane warns Supriya Sule not to make fun of Hinduism
महत्वाच्या बातम्या
- NDA बिहार निवडणुकीसाठी एनडीएची जागावाटप चर्चा अंतिम टप्प्यात
- Uddhav Thackeray : गणराया, अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त कर, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
- Manoj Jarange : प्रत्येकाने मुंबईला यावे, आता ही शेवटची लढाई, मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन
- Ajit Pawar “मग योजना बंद करू का?” बोगस लाभार्थी प्रकरणावर अजित पवारांचा सवाल