विशेष प्रतिनिधी
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आक्रमक नेते अमित साटम यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
गेल्या सहा वर्षांपासून आशिष शेलार यांनी मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. मात्र त्यांच्याकडे आता सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रीपदाची जबाबदारी असल्याने पूर्णवेळ अध्यक्षाची नियुक्ती आवश्यक होती. त्यामुळे साटम यांची निवड झाली आहे.
अमित साटम हे अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे तीनवेळा आमदार राहिले आहेत. नगरसेवक म्हणून आणि नंतर आमदार म्हणून त्यांनी पश्चिम उपनगरात दीर्घकाळ काम केले आहे. विधानसभेत आणि विविध व्यासपीठांवर भाजपची बाजू आक्रमकपणे मांडण्यामुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे. अभ्यासू आणि आक्रमक अशी त्यांची प्रतिमा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबईच्या नागरी प्रश्नांची जाण आणि कल्पकतेमुळे त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप घोडदौड राखेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमित साटम यांचा जन्म 15 ऑगस्ट 1976 रोजी मुंबईत झाला. त्यांनी मिठीबाई कॉलेजमधून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांत बी.ए. पूर्ण केले. पुढे महात्मा गांधी मिशन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (कार्मिक) पदवी मिळवली.
फडणवीस यांनी सांगितले की, 2017 च्या निवडणुकीपासून आतापर्यंत शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईत पक्षाची घोडदौड टिकवून ठेवली. आता साटम यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पुन्हा महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ही निवड झाल्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांकडून अमित साटम यांचे अभिनंदन करण्यात आले असून, आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्या आक्रमक नेतृत्वामुळे पक्षाला यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Ahead of the municipal elections, aggressive leader Amit Satam is set to take over as Mumbai President
महत्वाच्या बातम्या
- NDA बिहार निवडणुकीसाठी एनडीएची जागावाटप चर्चा अंतिम टप्प्यात
- Uddhav Thackeray : गणराया, अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त कर, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
- Manoj Jarange : प्रत्येकाने मुंबईला यावे, आता ही शेवटची लढाई, मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन
- Ajit Pawar “मग योजना बंद करू का?” बोगस लाभार्थी प्रकरणावर अजित पवारांचा सवाल