विशेष प्रतिनिधी
मुंबई: देशातील आजवरचा सर्वाधिक 3 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार 1997 ते 2022 या काळात मुंबई महापालिकेत झाला, असा हल्लाबाेल भारतीय जनता पक्षाचे नूतन मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केला आहे. महापालिकेला या भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यास आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षपदी निवड झाल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आमदार अमित साटम यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, “1997 ते 2022 पर्यंत मुंबई पालिकेत देशातील आजवरचा सर्वाधिक 3 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. महापालिकेला या भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याला आमचे प्राधान्य असेल. प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करेल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासाभिमुख, भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी भाजपा कार्यकर्ते प्रत्येक मुंबईकरांच्या दारावर पोहोचून त्यांचे आशीर्वाद घेतील.
अमित साटम म्हणाले की, “पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि मुंबईकरांना हक्काचे घर देण्यासाठी प्राधान्य राहिल. मागील काही वर्षांपासून मुंबई शहराची ओळख बदलण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्व दिले जाईल. मुंबईकरांची सुरक्षा आणि सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही मुंबई पालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आणि महायुतीचा महापौर करण्यासाठी काम करू
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला