Radhakrishna Vikhe Patil : जरांगे यांच्या सगेसोयऱ्यांच्या मागणीवर सर्वांची भूमिका सकारात्मक : राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

Radhakrishna Vikhe Patil : जरांगे यांच्या सगेसोयऱ्यांच्या मागणीवर सर्वांची भूमिका सकारात्मक : राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

Radhakrishna Vikhe Patil

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Radhakrishna Vikhe Patil  सरकारकडून शिंदे समितीला आणखी 6 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. तसेच जरांगे यांनी केलेल्या सगेसोयऱ्यांच्या मागणीवर आम्ही आज चर्चा केली आहे. सर्वांची भूमिका सकारात्मक आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.Radhakrishna Vikhe Patil

मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. त्यानंतर देखील जरांगे पाटील आंदोलनावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना म्हटले की हे फडणवीसांचे षड्यंत्र असून मी ते उधळून लावणार असल्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापूर्वी विशेष पुढाकार घेऊन मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. महाविकास आघाडीच्या काळात हे आरक्षण गेले. आता पुन्हा एकदा महायुती आल्यावर 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आता कायदेशीर प्रक्रिया जी करायची आहे ती आम्ही करत आहोत.Radhakrishna Vikhe Patil

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ही आमची पहिलीच बैठक होती, या बैठकीत आम्ही सगळ्या बाबींची चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. उपसमिती म्हणून आमची जी भूमिका घेतली आहे, जो आरक्षणाचा मुद्दा आहे, कुणबी प्रमाणपत्र द्यायचे आहे यावर देखील आमची चर्चा झाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी काय आरोप करायचा काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचे काम फडणवीस यांनी मिळवून दिले होते. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हे केले होते. फडणवीस साहेब आडकाठी कुठेही करत नाहीत. त्यामुळे जरांगे यांनी आरोप करणे योग्य नाही. शरद पवारांना देखील आपण विचारले पाहिजे की ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी काय केले मराठा समाजासाठी? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांनी काय केले मराठा समाजाच्या आरक्षणासाठी? असा सवालही विखे पाटलांनी उपस्थित केला.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, कायद्याच्या प्रक्रियेत काही बाबी अडकल्या आहेत. मनोज जरांगे पाटलांना आमची विनंती आहे की सरकार विशेष पुढाकार घेत या सगळ्या गोष्टी पाहत आहे. तसेच गणेशोत्सव आहे, अशा वेळी आपण आंदोलन करू नये. तसेच आमच्या समितीला देखील त्यांनी काही काळ दिला पाहिजे, अशी विनंती राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे.

Everyone’s stance on the demand of Jarange’s relatives is positive: Information from Radhakrishna Vikhe Patil

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023