विशेष प्रतिनिधी
मुंबई : आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोण हाथ टाकायच्या वार्ता करत असेल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही. म्हणून भाषा जपून वापरली पाहिजे, असा इशारा देत आमदार निलेश राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर संताप व्यक्त केला. Nilesh Rane
चिंचुद्रीचे कधी पाय मोजता आले आहेत का? तिचा पायाचा मेळच लागत नाही. चिंचुद्री सर्व ऋतूत लाल असते. शिवाय ती काय म्हणते हे देखील कळत नाही. त्यामुळे एकदा आंदोलन संपू द्या, नितेश राणेंना बघतोच, असा इशारा जरांगे यांनी दिला होता. यावर नितेश राणे यांची बंधू आमदार नीलेश राणे यांनी जरांगेंवर जोरदार पलटवार केला आहे. Nilesh Rane
नीलेश राणे म्हणाले, नितेश राणे एखाद्या विषयावर बोलल्यानंतर त्यावर तुम्ही टीका करा पण वैयक्तिक टीका नको. नितेश काही टोकाचे बोलला नाही, वैयक्तिक बोलला नाही. कुठल्याही धमकीला राणे परिवार कधीच घाबरत नाही, तुम्ही जसे मरायला तयार असता तसेच आम्ही राणे पण असतो. आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोण हाथ टाकायच्या वार्ता करत असेल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही. म्हणून भाषा जपून वापरली पाहिजे. कारण आम्ही तुम्ही काही परके नाही. विषय सोडवताना नातं तुटता कामा नाही याची काळजी घेतली पाहिजे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर “चिचुंद्री” असे म्हणत बोचरी टीका केली होती. यावर शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिले. याआधी नितेश राणे यांनी अबू आझमी आणि एमआयएमच्या नेत्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतल्यामुळे जरांगे त्यांच्यावर टीका करत असल्याचा पलटवार केला होता. त्यांनी म्हटले होते की, त्यांचे अब्बा स्टेजवर जाऊन त्यांना भेटत असल्याने जरांगे माझ्यावर टीका करणारच.
Nilesh Rane is angry with Manoj Jarange for calling Nitesh Rane a ‘chichundri
महत्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi मतचोरीच्या ‘अणुबॉम्ब ‘नंतर आता ‘हायड्रोजन बॉम्ब’ टाकू , राहुल गांधी यांचा इशारा
- Chhagan Bhujbal जरांगे यांच्या विरोधात छगन भुजबळ आक्रमक, ओबीसीतून मराठा आरक्षण विरोधासाठी मुंबईवर धडक
- ओबीसी कोट्यातून आरक्षणास ‘एसईबीसी’चा अडथळा, मराठा समाजाची दोन्ही आरक्षणे जाण्याची भीती
- Politicians during Ganesh Festival : गणपती बाप्पाच्या दर्शनात राजकारण्यांची मांदियाळी!