Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन

विशेष प्रतिनिधि 

मुंबई : मराठा समाजाच्या प्रश्नांवर संजय राऊत यांची भूमिका कायम दुटप्पी राहिली आहे. त्यामुळे त्यांना आरक्षणावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असे म्हणत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच राऊतांनी कॉँग्रेसची दलाली बंद करावी, असा सल्ला देखील बन यांनी राऊतांना दिला आहे. Navnath Ban



आरक्षणावर संजय राऊत यांना बोलण्याचा अधिकार नाही

मराठा समाजाच्या प्रश्नावर संजय राऊत यांची भूमिका ही कायम दुटप्पी राहिली आहे. त्यांनी कधी ‘मुक मोर्चा’ तर कधी आंदोलकांना ‘ढेकूण’ म्हणत त्यांचा अपमान केला आहे. मात्र, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे आझाद मैदानात जाऊन आंदोलकांना न भेटणारे, मराठा समाजाची हेटाळणी करणारे संजय राऊत यांना आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही, या शब्दात नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. Navnath Ban

दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्यसरकारवर मतचोरीचे आरोप केले होते. तेव्हापासून हा चर्चेचा विषय झाला आहे. या विषयाबाबत सतत काही ना काही ऐकायला येत आहे. मध्यंतरी हे सगळे आरोप फोल असल्याच देखील सिद्ध झालं होतं. तरीदेखील महाराष्ट्रामधील मविआतील नेते सतत राहुल गांधींना पाठिंबा देतांना दिसून येत आहेत.

निवडणूक आयोगावर लावण्यात आलेले सगळे आरोप हे खोटे होते. ज्या रीपोर्टस् च्या आधारे हे आरोप करण्यात आले होते ते चुकीचे असल्याचं संजीव कुमार यांनी स्वतःच कबूल देखील केले आहे. तरीदेखील यानंतर आता एक हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या आरोपावरही मविआतील नेते त्यांच कौतुक करतांना दिसत आहेत. Navnath Ban

संजय राऊतांनी कॉँग्रेसची दलाली बंद करावी

नवनाथ बन म्हणाले की, बिहारमधील राहुल गांधी यांच्या यात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल घृणास्पद शब्द वापरण्यात आले. जवळपास शंभर वर्षे जगलेली आणि राजकारणाशी काही संबंध नसलेल्या व्यक्तिबद्दल अशा पद्धतीने बोलणं हा संतापजनक प्रकार आहे. मात्र, त्याचं समर्थन करून संजय राऊत कॉग्रेसची दलाली करत आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासोबत जनतेचं आणि त्यांच्या आईचा आशीर्वाद आहे. त्यामुळे अशा कितीही शिव्या दिल्या, तरी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास नवनाथ बन यांनी व्यक्त केला. Navnath Ban

पुढे बन म्हणाले की, मत चोरीचे आरोप करून जनतेच्या मतांचा आणि निर्णयाचा अपमान करण्याचे काम संजय राऊत करत आहेत. ज्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मत देऊन निवडून दिलं, त्या जनतेला कमी लेखण्याचा प्रयत्न राऊत करत आहेत. यासाठी जनता यांना कधीच माफ करणार नाही. येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये जनता तुम्हाला घरचा रस्ता दाखवेल, असा इशाराही नवनाथ बन यांनी दिला.

मत चोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधी आता हायड्रोजन बॉम्ब आणणार असं कौतुक संजय राऊत करत आहेत पण राहुल गांधी यांचे आतापर्यंतचे सर्व बार फुसके निघाले आहेत, राहुल गांधींचे आतापर्यंतचे सर्व राजकीय प्रयोग फसले असतांना संजय राऊत त्यांची स्तुती करतात, ही दुर्दैवी बाब आहे. ज्यांना लोकसभेत व विधानसभेत पुन्हा पुन्हा मतदारांनी नाकारलं, अशा नेत्यांची चमचागिरी करणं म्हणजे महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेचा अपमान आहे. काँग्रेससोबत हातमिळवणी करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची काय अवस्था झाली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे, असंही नवनाथ बन म्हणाले. Navnath Ban

Raut should stop praising Rahul Gandhi’s failed experiments – Navnath Ban

महत्वाच्या बातम्या