विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Rajnath Singh कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरून राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे. काही राजकीय पक्षांकडून विद्यार्थी आणि तरुणांचा राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र देशातील सुज्ञ तरुण अशा राजकीय खेळी ओळखतात आणि विकास व राष्ट्रनिर्मितीचा मार्गच निवडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.Rajnath Singh
सोमवारी कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढला होता. पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या कारवाईनंतर अनेक विद्यार्थी आणि तरुण जखमी झाल्याचा दावा करण्यात आला.Rajnath Singh
या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी, 21 जुलै रोजी विविध विरोधी पक्षांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी जंतर-मंतरवर जाऊन अभिजीत दीपके आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेण्याऐवजी केंद्र सरकार पोलिसी बळाचा वापर करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळील त्रिमूर्ती चौक परिसरात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला.
या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विद्यार्थी आणि तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांच्या शिक्षण, रोजगार आणि भविष्यासंबंधी सरकार संवेदनशील असून कोणावरही, विशेषतः विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
काही विरोधी पक्षांचे नेते विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आणि संताप निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा वापर राजकीय फायद्यासाठी करणे योग्य नसून अशा प्रकारे तरुणांना भडकवणे देशहिताचे नाही, असे त्यांनी म्हटले.
विरोधकांनी रस्त्यावर आंदोलन आणि गोंधळ करण्याऐवजी संसदेत चर्चा करावी, असे आवाहनही राजनाथ सिंह यांनी केले. सरकार पावसाळी अधिवेशनात सर्व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे. तरीही विरोधक संसदेत चर्चा करण्याऐवजी रस्त्यावर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
विरोधक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत खरोखरच गंभीर असतील, तर त्यांनी संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्यावे आणि सभागृहात सविस्तर चर्चा करावी. संसद हे देशासमोरील गंभीर प्रश्नांवर तोडगा काढण्याचे योग्य व्यासपीठ आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.
दरम्यान, विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज सलग तिसऱ्या दिवशी तहकूब करण्यात आले. विरोधी पक्षांच्या खासदारांनी काळे कपडे परिधान करून संसद परिसरात केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा, अखिलेश यादव आणि इतर अनेक ज्येष्ठ नेते या आंदोलनात सहभागी झाले होते.
विरोधकांनी विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज, पेपरफुटी आणि तरुणांच्या भविष्याशी संबंधित मुद्द्यांवर तातडीने चर्चा करण्याची मागणी केली. केंद्र सरकार या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत असून विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात आला.
Rajnath Singh accuses Opposition of using students as political tools
महत्वाच्या बातम्या
- Punjab Farmers : पंजाबच्या शेतकऱ्यांचे दिल्लीकडे कूच स्थगित; 2 मागण्यांवर सहमती; शंभू-खनौरी बॉर्डर सील
- Remittances : युद्धाचा रेमिटन्सवर परिणाम नाही; विदेशातून भारतीयांनी पाठवले 14 लाख कोटी रु., 12 वर्षांत दुप्पट
- UP Govt : यूपीत पदवीधर विद्यार्थिनींना स्कूटी मिळेल; 330 किमी लांबीचा विंध्य एक्सप्रेस-वे तयार होईल; मंत्रिमंडळाकडून 18 प्रस्ताव मंजूर
- याला म्हणतात, Assignment based काम; CJP आंदोलनाच्या गदारोळात शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!!