विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: ‘नीट यूजी’ (NEET UG) फेरपरीक्षेत देशभरातून दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या हरियाणाच्या पांशुल बन्सलने ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने या आंदोलनाबाबत थेट भाष्य केले नसले तरी आंदोलनात उतरून वेळ घालवण्यापेक्षा घरात राहून अभ्यास करण्यावर भर दिल्याचे म्हंटले आहे. त्याचे हे विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे. ( Neet Paper Leak )
पहिल्यांदा झालेल्या नीट परीक्षेत पांशुलला 706 गुण मिळाले होते. यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहज प्रवेश मिळाला असता. मात्र परीक्षा रद्द झाल्यामुळे निराश होण्याऐवजी त्याने पुन्हा जोमाने अभ्यास करण्याचा निर्धार केला. मग दुसऱ्यांदा झालेल्या परीक्षेत त्याने 720 पैकी 715 गुण मिळवत देशात दुसरा क्रमांक पटकावला. खरं तर, पंजाबचा आर्यन गुप्ता आणि पांशुल बन्सल या दोघांनाही 715 गुण मिळाले होते. मात्र, टाय-ब्रेकिंग नियमांनुसार पांशुलला दुसरा क्रमांक मिळाला. यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने फेरपरिक्षेकडे गुण वाढवण्याची संधी म्हणून कसे पाहिले याबाबत सांगितले आहे.
पांशुलने सांगितले की, परीक्षा रद्द झाल्यामुळे सुरुवातीला तो नक्कीच निराश झाला होता. पण परिस्थितीमुळे निराश होण्यापेक्षा स्वतःच्या कामगिरीत सुधारणा करण्यावर भर देणे आणि घरातच राहून अभ्यास करणे त्याला योग्य वाटले. ‘मी आंदोलनात का सहभागी होऊ? असा प्रश्न मी स्वत:लाच विचारला. आणि त्यानंतर मी घरातच अभ्यास करून माझे कौशल्य आणि गुण सुधारू शकत होतो हे लक्षात आले आणि मी तसेच केले”.
दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पांशुल बन्सलची भेट घेऊन त्याचे विशेष अभिनंदन केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ‘मेटा’वर माहिती देताना शिक्षण मंत्री म्हणाले, “नीट यूजी 2026 मध्ये ‘ऑल इंडिया रँक 2’ मिळवणाऱ्या हरियाणातील पांशुल बन्सलची भेट घेतली. त्याचे यश हे भारतातील तरुण पिढीची जिद्द, चिकाटी आणि महत्त्वाकांक्षा दर्शवते. मला खात्री आहे की तो आपल्या उत्कृष्टतेने देशाच्या आरोग्यसेवा प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देईल.”
मात्र पांशुल बन्सलचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा नीट पेपरफफुटीप्रकरणावरून देशभरात निदर्शने अत्यंत तीव्र झाली आहेत. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. देशभरात सुरू असलेल्या आंदोलनावर थेट भाष्य करण्यास मात्र त्याने स्पष्ट शब्दांत नकार दिला. तरी त्याचे हे विधान लक्षवेधी ठरत आहे.
Focusing on studies is more important than protests; NEET topper Panshul Bansal’s statement sparks discussion.
महत्वाच्या बातम्या
- Punjab Farmers : पंजाबच्या शेतकऱ्यांचे दिल्लीकडे कूच स्थगित; 2 मागण्यांवर सहमती; शंभू-खनौरी बॉर्डर सील
- Remittances : युद्धाचा रेमिटन्सवर परिणाम नाही; विदेशातून भारतीयांनी पाठवले 14 लाख कोटी रु., 12 वर्षांत दुप्पट
- UP Govt : यूपीत पदवीधर विद्यार्थिनींना स्कूटी मिळेल; 330 किमी लांबीचा विंध्य एक्सप्रेस-वे तयार होईल; मंत्रिमंडळाकडून 18 प्रस्ताव मंजूर
- याला म्हणतात, Assignment based काम; CJP आंदोलनाच्या गदारोळात शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!!

